श्री रामाचे पद - राम दीनबंधू रे । भक्तपाळ ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


राम दीनबंधू रे । भक्तपाळ । तो कृपाळ । देव आमुचा ॥ध्रु.॥
दुष्टासि मारतो । दासासि तारितो । संकटें वारितो । सत्य वाचा ॥१॥
सुबाहु ताटिका । संव्हार सैन्यका । आनंद कौशिका । येजनाचा३ ॥२॥
तत्काळ पावला । लाउनी पाउला । उद्धार जाहला । अहिल्येचा ॥३॥
काननीं पेटला४ । पादपा भेटला । सप्रेम दाटला । कंठ ज्याचा ॥४॥
भीलटी वेधली । भावार्थें लोधली । शेष फळें खादलीं । विकल्प कैंचा ॥५॥
हिमाद्रिदुहिता । माईक मोहिता । ना कळे तत्वता । अंत६ ज्याचा ॥६॥
त्रैलोक्यनायकू । कल्याणदायकू । भक्तांसि रक्षकू । रुद्र साचा ॥७॥

N/A


References : N/A
Last Updated : March 22, 2014