श्री गुरूंचे पद - पतितपावन पावन योगी स्वामी...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
पतितपावन पावन योगी स्वामी माझा ॥ध्रु.॥
अनंत प्राणी जनीं । योगी जाहले मुनी ।
कथानिरूपणीं मननीं । लीन जाले ॥१॥
व्यापिलें हें भूमंडळ । कवित्वकळा तुंबळ ।
विवरतां केवळ । मोक्ष लाभे ॥२॥
नरनारी तटस्थ । अर्थ१ पाहाती समर्थ ।
येमपुरी ठेली वेर्थ । कलियुगीं ॥३॥
कीर्ति ऐकतां पापी । जाले अनुतापी ।
दर्शनें पुण्यस्वरूपीं । सिद्ध जाले ॥४॥
वेदगर्भा प्रगटवीले२ । बहुतां कळेसें केलें ।
पाषांडाते भ्रष्टविलें । नीतिन्यायें ॥५॥
मोक्षश्रिया आलंकृत । जाले संतमहंत ।
पाहोनी शरण येत । नाना मतें ॥६॥
ज्ञान वैराग्य भजन । स्वधर्म रक्षण ।
म्हणोनी अवतारी जाण । योगमूर्ती ॥७॥
न कळे कैसा तो महिमा । न कळे कीर्तीची सीमा ।
बुद्धि निधी शेष नामा । काय जाणे ॥८॥
दासा कल्याण केलें । निज धाम दाखवीलें ।
श्रुतिशास्त्रां ठक पडिले । मौन्यरूपें ॥९॥
Last Updated : March 23, 2014
TOP