श्री कल्याणचे पद - तो मज मानेना । सज्जनमनासी...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
तो मज मानेना । सज्जनमनासी मन मिळेना ॥धृ०॥
मार्ग सांडून चाळवतो । पुसतां ची चावळतो ॥१॥
देहबुद्धीनें बरळतो६ । जाणपणें तो रडतो ॥२॥
गुरुसी वंचितो वंचितो ॥ धनदारा अर्चितो ॥३॥
राजस तामस वाद करीतो । सत्वगुणाला छळितो ॥४॥
नरदेह गेलियां घावेना । कल्याणपद पावेना ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP