श्री गुरूचे पद - जग जगासी गुंतलें कामा । न...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जग जगासी गुंतलें कामा । निजानंदा जि पूर्ण घनशामा ।
तुझें नाम गाईन पूर्णकामा । तुजवीण न येतो कोणी कामा ॥१॥
विधिसुत वाल्मिक साक्ष ते ही । धृव प्रल्हाद अंबऋषी पाही ।
तीर्थांबृताची फळश्रुती पाही । रामनामें पवित्र पुण्य देहीं ॥२॥
बिभीषण विदुर नीच याती । निज ध्यासें वैष्णव धर्ममूर्ती ।
अजामीळ कुंटणी नीच वृत्ती । नाम घेतां उत्तम थोर कीर्ती ॥३॥
व्यासवसिष्ठहरादिक ध्याती । संतवृंदें कीर्तनीं गर्जताती ।
नामस्मरणें उत्तम पदप्राप्ती । नामनिष्ठे कामना पूर्ण होती ॥४॥
सर्व सिद्धी त्या सर्व काळ दासी । काय बोलों१ मी कोण महिमेसी ।
नाम जपतां कल्याण अहिर्निशीं । दीनापाशीं तिष्ठतु ह्लषीकेशी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP