मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
ज्यासी दीनबंधू नाम हें सा...

श्री गुरूचे पद - ज्यासी दीनबंधू नाम हें सा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


ज्यासी दीनबंधू नाम हें साजे । ज्यासी देहीं च देवपण गाजे ।
ज्ञानवैराग्यसंपन्न राजे । ज्याच्या२ दर्शनें चिन्मय पुण्य माजे ॥१॥
गे बाईये आवडी तयाची मज मोठी । चित्तीं अखंड पडिली मिठी ।
संत जनाची बहु उंच कोटी । कृपादृष्टी तारिल्या भक्तकोटी ॥ध्रु.॥
ज्याचा परमार्थवृक्ष अंकुरला । शाखापल्लवीं विस्तारला ।
नवविधा प्रकारें मोहुरला । शुद्ध नि:काम भजनें फळा आला ॥२॥
ज्याची अपार धारणा धृती । ज्याची वेदांत काव्यसंमती ।
ज्याची अगम्य न गमे गती । ज्याचीं चरित्रें सर्वत्र गाती गीतीं ॥३॥
सर्व तीर्थांचे तीर्थ ते साधु । सर्व देवांचा देव ते९ साधु ।
अग्रपूजेसी वंद्य ते साधु । सस्वरूपाचे मायबाप साधु ॥१४॥
ज्यासी मुळींच मीपण नाहीं । ज्यासी समान देखणें देहीं ।
जेहीं आपणांस सेविलें ठायीं । सर्व कल्याण त्याचिये पायीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP