श्लोक स्वामीचे
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
श्री रामदास प्रभु पावन धन्य साधू ।
कल्यानस्वामि पुढती माहिमा अगाधू ।
तेथूनिया मग पुढें तिसरी पिढी हो ।
त्या मुद्रलसि नमिजे अति आवडी हो ॥१॥
राजा शिवाजी प्रभु रामराजा ।
श्री शंभु शाहू हरिभक्तिकजा ।
ब्रह्मार्पणे हें स्थळ योगवासा ।
समर्पिलें त्या गुरु रामदासा ॥२॥
परंपरा नृपंवरीं निजवंशवृद्धी ।
हा डोंबग्राम दिधला निजमोक्षसिद्धी ।
आज्ञा समर्थ वदला नृप शीव साचा ।
पाळील तो क्षितिपती सुत भोसल्याचा ॥३॥
श्री रामचंद्र कुळदैवत भोसल्यांचें ।
प्रसन्नता गुरुकृपा फळलें फुकाचें ।
दिक्षा भली शिवनृपाप्रति योगवासी ।
प्रबोधिला गुरुवरें प्रभु रामदासीम ॥४॥
समाधिचें स्थळ निकें सुखप्राप्ति दैवा ।
तो लाधला प्रभु भला निजमोक्ष ठेवा ।
यालगि हे गुरुकृपा मुळिची मिरासी ।
कल्याणस्वामि प्रभु पावन योगवासी ॥५॥
श्री रामदास प्रभु पावन सत्कुळीं हो ।
सत् शिष्य तो अति निकाम हि मंडळीं हो ।
कल्याणकीर्ति वदती जगीं संतसाधू ।
कैवल्यदायक सखा महिमा अगाधू ॥६॥
N/A
Last Updated : March 27, 2014
TOP