मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नारायण विधि वसिष्ठ राम । ...

श्लोक स्वामीचे - नारायण विधि वसिष्ठ राम । ...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

नारायण विधि वसिष्ठ राम । रामदास कल्याण धाम ॥
सज्जनगडनिवासी । माझी रामदास माय ॥
श्रमहरणीतीरनिवासी । माझी कल्याण माय ॥
पाय तुझे गुरुराजा । दावी कल्याण महाराजा ॥१॥
योगीयांचा राणा । जय जय कल्याण कल्याणा ॥२॥

पुण्यतिथीचे श्र्लोक

शके षोडशे त्रीदशे आणि सा हो ।

जये नाम संवछरीं पूर्ण पाहो ।
आषाढी तिथी शुद्ध त्रयोदशीसी ।
प्रयान स्वकल्याण मोक्षालयासी ॥१॥
सोळाशेवरी तीन जाण दशकें पंचाब्दसंख्या वसे ।
तेरावी तिथि शुक्ल पक्ष मनुज्या आषाढमासीं असे ।
वर्षाचे विजय नाम जाण बरवें श्रीसद्‍गुरु ध्याइजे ।
साष्टांगें नमुनी तयासि वदनीं कल्याण हे बोलिजे ॥२॥



N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP