श्री रामाचे पद - अहो जय रामा हो ॥ पतीतपावन...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अहो जय रामा हो ॥ पतीतपावन पूर्णकामा हो ॥ध्रु.॥
सुरवरवरदा रघुवरवेशा । दीनोद्धरणा दिनकरवंशा ।
अयोध्याधीशा तूं जगदीशा ।
ध्याती मुनीवर हरिवर ईशा, भक्तवछळसर्वेशा ॥१॥
दशरथनंदना तूं जगजीवना । अहिल्याउद्धरणा तूं मनमोहना ।
हीनदीनपावन अरिवीरकंदना ।
योगीमंडण तूं सुखसदना, पाहे पाहे तूं अनन्या ॥२॥
गिरिजापति वर अंतर जीवासी१ । सकळ चराचर अंतरवासी ।
धर्मपरायण धार्मिकरासी ।
पुण्यपरायण शरयुनिवासी । जड जीवा कल्याण करीसी ॥३॥

N/A


References : N/A
Last Updated : March 22, 2014