श्री कल्याण स्तवन - ऐसा स्थितीवान या जगीम दुर...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
ऐसा स्थितीवान या जगीम दुर्लक्ष । परमार्थाचा लाभ जया प्राप्त ॥१॥
सर्वीजन सुखी असावे हा हेत । कापटय किंचित नाहीं चित्तीं ॥२॥
परोत्कर्षी सहन उपकार चि करी । गुरुसेवेवरी प्रीत मोठी ॥३॥
गुरुपुत्र कोणी निष्टल्या सावरी । आनंद चि भरी बुद्धिदाता ॥४॥
न रमोन विरवीं बहुता करी सुखी । अंतर पारखी भक्तीवंत ॥५॥
महंती करूं जाणे न संडी च प्रेम । ज्याचा आत्माराम साहकारी ॥६॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP