श्री रामाचे पद
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
राघव माये दावी पाये आतां वो ॥ध्रु.॥
त्रिविध तापें पोळविले । साही वैरी मजला पिडिती ।
हीण मी करूं काये दावी पाये आतां वो ॥१॥
मानस माझें आवरेना । याच्या संगें वृत्ति भंगे । हीण मी० ॥२॥
पूर्वापारा१ करुणाअपारा२ । नाहीम थारा वारा पारा । हीण मी० ॥३॥
विश्वपाळा विश्वनाथा । ऐके माझी विनती आतां । हीण मी० ॥४॥
नाम तुझें कल्याण माझें । आपुल्या ब्रीदा राखे स्वामी । हीण मी० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP