श्लोक स्वामीचे - सिनेच्या तटाकीं महा पुण्य...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सिनेच्या तटाकीं महा पुण्यभूमी । समाधी विराजे तये डोंबग्रामीं ।
बहू रम्य शोभा दिसे गोपुराची । जगीं धन्य ते कीर्ति कल्याण ज्याची ॥१॥
गुरुभक्त वीरक्त जो ब्रह्मच्यारी । महा तीव्र वैराग्य तें निर्विकारी ।
क्षमा शांति अद्भूत त्या निस्पृहाची । जगीं धन्य ते कीर्ति कल्याण ज्याची ॥२॥
जगी बद्ध अज्ञान ते सिद्ध केले । बहू संत ते महंत होऊनि ठेले ।
कृपा आगळी सौम्य लीळा जयाचा । जगीं धन्य ते कीर्ति कल्याण ज्याची ॥३॥
प्रतापें बळें आगळा योगिराणा । नसे ते सीमा वर्णितां पूर्ण ज्ञाना ।
पदीं लागतां मुक्ति लाभे फुकाची । जगीं धन्य ते कीर्ति कल्याण ज्याची ॥४॥
मही मंडळीं रामउपासना हो । बहू नेटकी सुद्ध दीक्षा जना हो ।
प्रिती लविली भक्ति त्या राघवाची । जगीं धन्य ते कीर्ति कल्याण ज्याची ॥५॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP