श्री रामाचे पद - जय जय जय श्रीरामा । वामे ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जय जय जय श्रीरामा । वामे राजित निज रामा ।
मुनिवर गुरुवर गुरु रामा । स्मरहरमानसविश्रामा ॥ध्रु.॥
सुरनर वानर प्रतिपाळा । सृष्टि चराचर कृपाळा ।
वेष्टित पंडित ऋषिपाळा । धरणीधरवर भूमिपाळा ॥१॥
फणिवरशयना सुखकरणा । दीनोद्धारण तमहरणा ।
वंशाभरणा भवतरणा । पतीतपावन तूं स्मरणा ॥२*॥
शचीवरमानसमंदीरा । चरणसंव्हाहन इंदिरा ।
दितिकुळकंदन रणधीरा । जड मूढ पावन परतीरा ॥३॥
रघुवीर१ कल्याण पददाता । मुक्ती न लगे२ गुण गातां ।
भजन विवेदन विवरीतां । माईक३ सकळिक मोहममता ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP