श्री गुरूचे पद - पाहा हो पाहा हो सये पाहा ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
पाहा हो पाहा हो सये पाहा हो । संगातीत निजसुख लाहा वो ॥ध्रु॥
मीपण तूंपण सर्व मेळउनि गुणागुण । सदुगुरूचे पदीं आधीं वाहा वो ॥१॥
अमळ विमळ ब्रह्म सर्वगत सदोदित । साक्षिणीचें मूळ निरसाहा वो ॥२॥
श्रीगुरु कल्याणस्वामी पाववितो निजधामीं ।
मौन्यगर्भा शोधुनियां राहा वो ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP