गोविंदकृत पदें २९४ ते २९७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २९४ वें.
कोण वनाप्रति आला । पाहा शोध करा ! ॥ध्रुवपद॥
सुंदर वय तरुणाकृति तो नर नीलतनू ।
चंड पराक्रमी दिसतो, जैसा भानू ।
वीर चक्रांत धुरंधर करिं दिव्य धनू ।
श्रेष्ठ वात गमे मज, हरिहर नेणों ॥कोण०॥१॥
ब्रम्हादिक सुर वंदिति ज्याच्या पदपद्मा ।
सेवि निरंतर ज्याचे स्वकरें पद्मा ।
दर्शनमात्रें झालें सुख हृत्पद्मा ।
कां प्रिय त्याचें घडतें आम्हां अधमा ॥कोण०॥२॥
भस्मचर्त्तित दिव्यतनू शिरि स्निग्धजटा ।
फेटा फार विराजे तनु मेघघटा ।
वीरकंकण पेटयाचें सज वाहुवटा ।
दिव्य करांगुली मुद्रा पाहा त्या सुभटा ॥कोण०॥३॥
वाटे पाय धरावें जी नरहरिराया ! ।
कोण असे वीरशार्दूल मज अमजुनियां ।
त्याचें दास्य घडावें नमितों पाथां ।
गोविंदासी तपदीं द्या लोटुनियां ॥कोण०॥४॥
पद २९५ वें.
कधी मी पाहिन सकी पद्माक्षी । जानकी हरिणाक्षी ।
जे कां द्विजदैवत अग्निसाक्षी । वरली युगपक्षी ।
हरिविधि सुरकिन्नर नर वर्णिति सगुण चरित्र जिचें विरुपाक्षी ! ॥ध्रुवपद॥
जीच्या स्वरुपासी न दिसे तुलना । त्रिभुवनिंच्या ललना ।
मदनाला लाजविते शशिवदना । ऐसी गजगमना ।
उठावा ॥ विरह विकळ गळ गळ जळ स्रवतें श्रीरामाचिया उभयाक्षी ॥कधी०॥१॥
अरुणारपि अति मृदु पदतळ साजे । पदभूषण गाजे ।
जीचे स्त्रिग्धांगसुवर्ण तनू जे । अलंकृत बहु साजे ।
उठाव ॥ सैंवरीं महिवरनयन भ्रमरवत सीतावदनसरोजा लक्षी ! ॥कधी०॥२॥
सीताविरहें व्याकुळ रघुराणा । जो वंदा पुराणां ।
नाना नाटक करि लीला जाणा । तारक त्रिभुवना ।
उठाव ॥ चरण धरुनि करि नमन सदोदित गोविंदवरद जगस्त्रयसाक्षी ॥कधी०॥३॥
पद २९६ वे.
देईं राया रघुराजजाया ! ॥ध्रुवपद॥
मान वचन प्रमाण, त्यज अनुमान, न धरिं गुमान हृदयीं, सान न मनि निद्रान तुजप्रति प्राण घेइल जाण रघुविर ॥देईं०॥१॥
काळ अजसुत बाळ त्रिभुवनपाळ, परम दयाळ जगदिश भाळलोचन माळ जपत, तमाळनीळ महाराजा ॥देईं०॥२॥
पाय नमुनी आय दुर करी, काय सह समुदाय वाचवि तोषुनी जगमाय अर्पुनि गाय गीतीं गोविंद प्राथिंत ॥देईं०॥३॥
पद २९७ वें.
कपीदा ! सांग मला तूं कोठे वसे श्रीराम । मनविश्राम ! ॥ध्रुवपद॥
भक्ताची मनोवांछित सिद्धि । पावन ज्याचें नाम ॥कपीद्रा०॥१॥
त्याविण क्षण पल युगसम जातें । दाखविं निजसुखधाम ॥कपींद्रा०॥२॥
सत्तेनें जो त्रिभूवन चालवी । हृदयीं आत्माराम ॥कपींद्रा०॥३॥
गोविंद प्रभु स्वामी नरोत्तम । पुरवी सर्वही काम ॥कपींद्रा०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP