मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
अवधूतकृत पदें १४४ ते १४७

अवधूतकृत पदें १४४ ते १४७

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १४४ वें.

यादवेंद्रा ! रें ! । रुक्मिणीरमणा ! ॥ध्रुवपद.॥
यादवेंद्र यज्ञोद्भवयंता । यज्ञदेव ब्राम्हाणरूपधर्ता ।
यज्ञदानत्पपालनकर्ता । यज्ञकामसक्रतुफलदाता ॥याद०॥१॥
वेद विदित विधिउद्भव कारण । विद्वज्जन सम्मिनि जीवन ।
विप्रपालना निपुनित तोषण । विरिंचि विनवित तव पदपंकजा ॥याद०॥२॥
देवकीनंदन अघगणखंडान । दानवकंदन यदुकुलमंडण ।
दुर्मतिदंडन देवदयाकर । अवधुत शरणाग्त तवचरणा. ॥याद०॥३॥

पद १४५ वें.

गिरिजारमणा ! पाहि पाहि रे ! ॥ध्रुवपद.॥
जटामुगुटमंडित अखंडित । खंडित द्वैत अखंडित शाश्चत ।
भिडिपालधर रुंडमालधर । शिवदयार्णव भवनिधितरणा ! ॥गिरि०॥१॥
चंद्रसूर्य शिरीं नेत्रत्रय शिव । पंचवक्र सूत्रत्रयधारक ।
शत्रुकाम तृणपावकसम हृत । मूल मंत्र जपका करि शमना ॥गिरि०॥२॥
दशकर कलशत्रिशूलडमरुधर । व्याघ्रांवरधर विश्वबीज निज ।
विश्वनाथ विरुपाक्ष विराजित । अवधुत अनंत तत्पर चरणा ॥गिरि०॥३॥

पद १४६ वें.

रामा ! रामा ! हो ! श्रीसुखदायी ! ॥ध्रुवपद.॥
रामा न भजुनि कामादि नको । दामारहित सुदामा समगति ।
क्षमाजाधिप ध्याउनि निजगति । पाउनि समगत रामा रामा ॥रामा०॥१॥
योध्याधिप तत्पद्मीं आणुनि । सध्या सुख मन बुध्यादिक  करि ।
विद्या प्रगट अविद्या नासुनि । निज अंतरी प्रगटवि जयरामा ॥रामा०॥२॥
लक्ष्य धरुनि वरि मोक्ष फुकाचा । पक्ष अवदती तो विबुधाचा ॥
शास्त्रश्रुतिइतिहासस्मृतिचा । जाणुनि अनंतसुत धरि प्रेमा. ॥रामा०॥३॥

पद १४७ वें.

रामचंद्रा ! रे ! राजाधिराजा रामा ! ॥ध्रुवपद.॥
रामचंद्र रघुवीर रघूत्तम । राजीवनेत्र रविकुलदीपक ॥
रावणमारक रजनीपतिधर - । प्रियकर सुरवरदायक रामा ! ॥रा०॥१॥
महिजापति महाराज महाबळी । महिसुत तारितसे उदधीजळी ॥
मदनदहनमुनिमानस जो बळी । महिमा न कळत निगम निराक्रमा ॥रा०॥२॥
चराचरांतर बाहेर सुखकर । चर्मचक्षुसी नव्हेसि गोचर ॥
चर्मांबरधर ध्यानि निरंतर । चंदन चर्चुनि मंगलधामा. ॥रा०॥३॥
अयोध्याधिप अपराध क्षमा करीं । अंजनिसुत हृद्भुवनिं निरंतरीं ॥
अज अव्यय अनाम अक्षरी । अनंतसुत सुखदायक रामा. ॥रा०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP