विठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ६९ वें.
कसा तारिल पंढरीराव ॥ध्रुवपद.॥
भाव तारिल भाक्ति करीना । उगाच हरि ! मज पाव. ॥कसा०॥१॥
माता पित्याशीं लाथा मारी । मेल्यावरि करि काव ॥कसा०॥२॥
थरथर कांपे शक्ति हरल्या । म्हणे, ‘देवा ! आतां धांव.’॥कसा०॥३॥
विठ्ठलनाथा सद्नुरुचरणी । दिधला अक्षय ठाव. ॥कसा०॥४॥
पद ७० वें.
कां रे ! भुललासी गंव्हार ! कां रे ! भुललासी ॥ध्रुवपद.॥
सर्व म्हणसि माझें माझें । कुटुंबासी वाहस्शी ओझें ।
अंतकाळी कोण तूझें । एकलाची जासी ॥कां रे०॥१॥
आलासि कोठुनी जासिल कोठे । आगम निगम पाहें वाट ।
काळ करिल आठवाठ । त्या काय जबाब देसी ॥कां रे०॥२॥
जन्मा येउन सार्थक करीं । सद्नुरुचे पाय घरीं ।
विठ्ठलनाथ भजन करी । बोध भाविकांसी ॥कां रे०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP