गोविंदकृत पदें २४८ ते २५०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २४८ वें.
राहें सुखीं श्रीरामा हृदयी ! ॥ध्रुवपद.॥
सर्व जिवांचा वास तवान्तरीं । मग मानसविश्रामा ॥राहें०॥१॥
तुझ्या मंत्रौपासनेकरुनि । शुद्ध किरें गुणग्रामा ॥राहें०॥२॥
सीतालक्ष्मणसहित रघूत्तमा । प्रगटे निजसुखधामा ॥राहें०॥३॥
गोविंदाची आशा पुरवी । हृदयस्था गुणग्रामा ॥राहें०॥४॥
पद २४९ वें.
सखया ! रामा ! गुणग्रामा ! सत्वर येईं ।
सुकुमारा राजसा क्षेम देईं ! ॥ध्रुवपद.॥
रात्रंदिवस झुरतसे मन माझें ।
कधिं पाहिन मी द्दष्टिनें रूप तुझें ॥सखया०॥१॥
पाप माझें कैसें हें फळास आलें ।
पाहतां पाहतां निजरूपीं लावविले ॥सखया०॥२॥
कोटी भानू चंद्राग्नी लोपुनि जाती ।
स्वयंप्रकाश का वर्णूं तुझी दीप्ती ॥सखया०॥३॥
नरहरिकृपें देखिलें तुझिया पायां ।
गोविंदाची चुकवी अविदामाया ॥सखया०॥४॥
पद २५० वें.
कां रुसलासि दयाळा । मजवरि रामा ! ॥ध्रुवपद.॥
भक्तकामकल्पद्रुम व्रिद विलसे पाय़ीं ।
दीनवत्सल कीर्ति हे भुवनीं ती ही ।
गर्गति शास्त्रपुराणें देति ग्वाही ।
मजविषयीं काय दयाही उरली नाहीं ॥कां रुस०॥१॥
जें म्यां दुष्कृत केले इहपरजन्माचें ।
ठाउक तुजलां आहे, वदुं काय वाचे ।
पुण्यावीण घडेना दर्शन प्रभुचें ।
हें फळ कळलें मजला दुर्दैवाचें ! ॥कां रुस०॥२॥
ऐसा पतित असें मी, मजला त्राता ।
अन्य नसे मज कोणी जानकिकांता ! ।
येइं समर्था सदया मनविश्रांता ! ।
पाहें ब्रिदाकडे आपुल्या, तूं हृदयस्था ।
दिन गोविंदा न करीं पायांपरता ॥कां रुस०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP