ज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १४ वें.
धुतांच मोतीं जळीं हरपलें सखोल मोठें पाणी ।
चला पाहूं सहा चार अठरा जणी ॥ध्रुवपद.॥
प्रपंच धोंडा. मृगजळ पाणी, आपटीत होतें चोळी ।
विसरलें सूख घसरलें तळीं ॥
सखे ! मायेनें मोतीं दडविलें भवसिंधूचे जळीं ।
होती गडे भ्रांति बहिण जवळी ॥
तिनेंच मजला गोष्टी विनविल्या चित्त गेले भुलोनी ॥चला०॥१॥
आठ जणींनीं मोतीं दडविलें. वर ठेविला धोंडा ।
अशाच पाहती अवध्य रांडा ॥
बारा सोळा तळीं उतरल्या, त्यांनीं धरिला दांडा, ।
ठाऊक सत्रावीला झेंडा ॥
त्या गर्दीमध्यें गर्क मी झालें येकलीच बाई ! वनीं ॥चला०॥२॥
चवघी जणी सत्वर मिळुनी डोळीं अंजन घाला ।
माझ्या मोत्याला प्रेमें न्याहाळा ॥
ज्ञानबोधाचि लावून दिवटी बरवी वात उजळा ।
माझे मोत्याला सर्व कळा ।
प्रपंच पडदा फाडुन गुरुपदी लागावे ठिकाणीं. ॥चला०॥३॥
चौघी जणी मोक्षनायिका मजला धरा हातीं ।
उतरा सागर पैल पथीं ॥
या मोत्याच्या साठीं मजला जाणें आहे सती ।
म्हणून मीं येते काकूळती ॥
ज्ञानदेव म्हणे चिन्मय मोतीं न मिळे गुरुवांचोनी ॥चला०॥४॥
पद १५ वें.
उठिं उठिं बा गोपाळा ! । उघडीं स्वरूफलोचना ।
सरली अवघी रात्री । उदय झाल अरविकिरणा. ॥ध्रुवपद.॥
प्रबोध. पाहांट झाली सरलें तिमिरज ।
गुरुकृपेचे असणी पाहातं सुरंग समतेज. ॥उठिं०॥१॥
इश्य भासणें चांदणिया दिसती लोपलिया ।
देहबुद्धिचे कुमुदें सोसुनि गेलीसे विलया ॥उठिं०॥२॥
वैराग्याचे रश्मिचित्तें द्रविला रविकांत ।
प्रगटे ज्ञानाग्नि विषयवणवा जाळित ॥उठिं०॥३॥
तृष्णेचीं श्वापदेंपळत सुटलीं अद्भुत ।
लटकें हें मृगजळ परी मूढ भ्रमित ॥उठिं०॥४॥
इंद्रिअय गोधनें नेईं निर्गुणा ! वना ।
सुटली मन वासुरें तुजविण नाकळती कान्हा ॥उठिं०॥५॥
वागविधाचे उलुकें रिघती मौन्याचे ढोली ।
विकल्पाचा वाडा साही चोर सांडिले ॥उठिं०॥६॥
सर्व वासना सोडुनि उदमी झाला पैं नर ।
वासना वेसनेचा येणें त्यजिला व्यापार ॥उठिं०॥७॥
योगविद्येच्या पंथें साधक चालसिकेली ।
उपनिषदाचे अर्थें शब्द करिती कोकिला ॥उठिं०॥८॥
म्हणे ज्ञानदेव योगि झालासे स्थीर ।
निवृत्तिप्रसादें समाधि सवेगसार ॥उठिं०॥९॥
पद १६ वें.
सब घट देखो माणिक्मौला । कैसे न कडू मै काला धवला ।
पंचरंगसे न्यारा होई । लेना एक और देना दो ॥ध्रुवपद.॥
निर्गुन ब्रम्हा भुवनसे न्यारा । पोठी पुस्तक भये अपारा ।
कोरा कागद पढकर जाय । लेना एक और० ॥१॥
अल्लख पुरुष मै देखा द्दष्टि । कर भाउन समार मुष्टि ।
छाटामे कछु न होय । लेना एक और० ॥२॥
खलखदिया त्रिनिका । तिरते तिरते यम न थका ।
इस पार पावे न कोयी । लेना एक और० ॥३॥
निर्गुन दाता कर्ता हर्ता । सब जुग बनमो आपहिता ।
सदा सर्वदा अचल होई । लेना एक और० ॥४॥
निर्गुन सागर आथक पसारा । वाको तरग सकल संसारा ।
उद्धिव प्रलय वातो होय । लेना एक और० ॥५॥
सप्तहि सागरशायी कर्ता । घरती जो कागद लिखो पंडिता ।
एक अक्षर पडेन कोय । लेता एक और० ॥६॥
कहे ज्ञानदेव मनमो धरियो । सप्तहि सागर अगो धरियो ।
पिंड्मे आवे जावे कोय । लेना एक और० ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP