गोविंदकृत पदें ३१८ ते ३२०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३१८ वें.
श्रीरामचंद्रपदसरोज ध्याइम मानसा ! ॥ध्रुवपद॥
उदार समरधीर राम । त्यजुनि स्मरविलास धाम ।
पाहुनि उपाधिभ्रम । भुलला कसा ॥श्रीराम०॥१॥
असार संसार सार । मानुनि व्यवहार फार ।
करसि जाणुनी विकार । होतो पदरसा ॥श्रीराम०॥२॥
तारणार हे पदारविंद । हा भवाब्धिन्हद ।
जाणुनि गोविंद लुब्ध । होतो पदरसा ॥श्रीराम०॥३॥
पद ३१९ वें.
सांवळी सुंदर कांती । विटेवरी विहलमूर्ती ।
गोगियांची मनविश्रांती । विठाई माझी ! ॥ध्रुवपद॥
गोजिरें जयाचें ठाण । अरुणापरि पदतळ समचरण ।
जान्हवीचें जन्मस्थान । विठाईं माझी ॥१॥
कासे दिव्य पितांबर पिंबळा । वैजयंती माळ गलां ।
आपाद लंवितसे वनमाळा । विठाई माझी ॥२॥
सिंहासम कटिभाग साजे । खंव्याचें कटिसूत्र विराजे ।
क्षुद्रघंटिका मंजुळ वाजे । विठाई माझी ॥३॥
कंठीं मुक्तफळांची माळा । उत्तरी वस्त्र पितांबर धवळा ।
पाहतां दिठीं न पुरे मुखकमळा । विठाई माझी ॥४॥
वक्ष:द्स्थळ अति रुंद जयाचें । नासिक तिलपुष्पापरि त्याचें ।
सुंदर मुखकल्हार हरीचें । विठाई माझी ॥५॥
रत्नजडित मुगुटाची आभा । अंगीं भिमकाची कुमरी ।
अर्ध द्दष्टि प्रभुची नासाग्रीं । विठाई माझी ॥७॥
गुरु महाराज नरोत्तम मूर्ती । अंतरगृहीं हृत्कमलावरतीं ।
गोविंदाची सुखविश्रांती । विठाई माझी ॥८॥
पद ३२० वें.
विठाबाई माय, माय पंढरीची । बहुत लमिवाळु अंतरीची ! ॥ध्रुवपद॥
तरुण सांवळी, सांवळी अंगकांती । दोहि पदतळीं अरुणदीप्ती ।
द्दष्टीं पाहतां, पाहतां दिव्यमूर्ती । वेधली विश्वचित्तवृत्ती ।
पितांबर कटीं, कटीं तयाभवतीं । वेलि सुवर्ण रत्नदीप्ती ।
दिव्य मुद्रिका, मुद्रिका उभय करिंची ॥बहुत०॥१॥
जन्मला विधी, विधी नाभिकमळीं । दोंदिल उदर, वरी त्रिवळी ।
कटी कर उभी, उभि भक्ताजवळी । सिंधुतनया हृदयीं धरिली ।
मुक्तमाळिका, माळिका त्यांत पोंबळी । भुजबंदांत रत्नें जडलीं ।
माळ तुळसीच्या, तुळसीच्या मंजुरीची ॥बहुत०॥२॥
चुबुक हनुवटी, हनुवटी द्दष्टि नाकीं । दुरुनि रुक्मिणीला अवलोकी ।
वामभागी हे, भागीं हे सखि भिमकी । हास्यवदनेंदु पाहे तंव कीं ।
हरिच्या रूपा, रूपा कोण लेखी । भक्तभयसागर सोकी ।
मूल यशोमती, यशोमतिच्या उदरींची ॥बहुत०॥३॥
मुगुट मस्तकीं, मस्तकीं दिव्य शोभा । मकरकुंडलें रन्त आभा ।
वदन साजिरे, साजिरे कोमल गाभा । पाहतां तया पद्मनाभा ।
केशरी टिळा, टिळा गंध शोभा । विटेवरि गुरु नरहरि ऊभा ।
मूर्ति गोविंद हृत्पद्ममंदिरींची ॥बहुत०॥४॥
Last Updated : November 11, 2016
TOP