गोविंदकृत पदें २७४ ते २७७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २७४ वें.
देखिला नयनीं अयोध्येचा राणा । वंदे निगमा शास्त्रपुराणा ! ॥ध्रुवपद.॥
नीलमणी जसा तशी अंगकांती । चर्चिली सर्वांगी विभुती ।
मकरकुंडलें कुंडलें रत्नदीप्ती । कटी वल्कलवसनें असती ।
सरळ भुजदंड गजशुंडापरि दिसती । मुद्रिकारत्न तयेभवती ।
वदन साजिरें साजिरें वर्णवेना । वंदे निगमा शास्त्रपुराणा ॥१॥
मस्तकी जटा जटाजूट साजे । पदी ब्रिद भुवनत्रयीं गाजे ।
जया वंदिती वंदिती सर्व राजे । धर्म रक्षायाच्या व्याजें ।
फिरतसे वनीं वनिं त्यागुनि राज्य । दुष्ट निशिचर वधुं या काजें ।
मनुजरूप धरिलें जगिं जाणा । वंदे निगमा शास्त्रपुराणा ॥२॥
पदरजस्पर्शें तरली पद्मजबाळा । भार्गवाचा रणमद हरिला ।
जटायू पक्षी पक्षी उद्धरिला । पवनात्मज हृदयी धरिला ।
सद्रुरु माझा त्या प्रभु नरकेसरिला । भावें गोविंद शरण आला ।
हृदयिं द्दढ धरिलें धरिले तच्चरणा । वंदे निगमा शस्त्रापुरणा ॥३॥
पद २७५ वें.
काय सांगूं वात्सल्य श्रीरामाचें । शंकर हृदयी जपतो नाम ज्याचों ॥ ध्रुवपद.॥
अयोष्येहोनी मी येतां हनूमंता । प्राणनाथ लक्ष्मण संगें भ्राता ।
मार्गी चालतां मी राहें पंथ क्रमितां । उभा राहोनि जालंगी मातें भर्ता ॥का०॥१॥
घेवोनियां विश्रास वृक्षातळी । अमृतहस्तें मम मुखातें कुरवाळी ।
‘पंथ क्रमितां श्रमलीस जनकबाळी’ । संबोखीतां श्रम जातसे ते काळीं ॥का०॥२॥
जेव्हां आली साकेतीं जनकतनया । नाहीं गेली पुनरपी जनकालया ।
क्षणही वियोग नव्हता त्याच्या पायां । या दुष्टानें बिघड केला वांया ॥का०॥३॥
रामवियोगाच्या दु:खें दीन झाली । सरिता सागर पर्वत आड पडली ।
दैवें तुझी मारुती ! भेट झाली । श्रीरामातें दाखवीं नेत्रकमळीं ॥का०॥४॥
रामप्राप्तीस्तव सद्रुरू तूंची माझा ! कृपा करुनी दाखवीं रमराजा ।
अनन्य भावें मी शरण महराजा । ऐसी बोले गोविंदप्रभुची भाजा ॥का०॥५॥
पद २७६ वें.
केला राम धनी । अघटित ज्याची करणीं ॥ ध्रुवपद.॥
सच्चित्सुख आनंद पराप्तर व्यापक जो त्रिभुवनीं ॥केला०॥१॥
विश्वपटी तंतुरूप नटला । घ्यानीं रमती सुरमुनी ॥केला०॥२॥
प्रल्हादास्तव स्तंभी प्रगटला । गोविंदवरदायनी ॥केला०॥३॥
पद २७७ वें.
भक्तकामकल्पद्रुम जो श्रीराम अयोध्यापती ।
तोचि उभा घनश्याम छबेला सिंदुरगडपर्वतीं. ॥ ध्रुवपद.॥
पीतवसन परिधान कोर तगटी त्यावर भर्जरी ।
खव्याचें कटिसूत्र जडित नवरत्न नितंबावरी ।
पांधरला दिव्यांबर सुंदर सुवर्णपट केशरी ।
युग्म करीं पवच्या जडिताच्या, नवरत्नें त्यावरी ॥
चाल ॥ नवमेघ तनू साजिरीं ।
मुकुट शोभिला शिरीं ।
श्रुतिकुंडलमकराकृति ॥
उठाव ॥ भृगुअंगिरातनय येउनि उभय कर्णीं लागती ।
सत्वर वध या दशाननाला घेईं यश रघुपती ॥भक्त०॥१॥
मुक्तहार कंदरांत पदकीं रत्न फार जडियले ।
मध्यहिरा दैदीष्य तेज राउळामाजि पडियेलें ।
हास्ववदन अनुग्रहार्थ सुचची परि मौन धरियलें ।
कमलदल सरळा शुअनासिक पाहुनी शुक लाजले ॥
चाल ॥ वामांगी जानकी सती ।
जे तप्त सुवर्णाकृति ।
दशवदनाची सद्नती ।
उठाव ॥ असे उभय दपती विलोकुनि मनीं लागलीं प्रीती ॥तोचि०॥२॥
प्रर्हादास्तव स्तंभीं प्रगटला स्वामी गुरु नरहरी ।
त्यानें मज दीनास लक्षुनी कृपा अनुग्रह करी ।
मी बाळक अज्ञान वरदकर कृपें ठेविला शिरीं ।
दाखविला श्रीराम चराचर जीव जया अंतरी ॥
चाल ॥ तें सुख वर्णितं मये ॥
वैखरी उगिच स्थिर राहे ॥
गोविंदवृत्ति डुल्लताहे ॥
उठाव ॥ जो दर्शनमात्रें सकळांला देतो उत्तम गती ॥तेचि०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP