मुकुंदराजकृत पदें १ ते २
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १ लें.
विठ्ठले ! रुक्माई ! सांवळे विठ्ठले ! रुक्माई ! ॥ध्रुवपद.॥
नक्रें धरितां गजेद्रासी श्रम झाले तेव्हां ।
प्ता पुत्र हे आप्तहि मानुनि गौरविलें सर्वां ।
परंतु कोणी नये कामा ममता जिवभावा ।
तेव्हां हें मायिक जाणुनि आठविले तव पाय ॥विठ्ठले०॥१॥
‘हरि हरि’ स्मरतां प्रर्हादासी गांजितसे वैरी ।
शस्त्रें अस्त्रें विष घालुनि अग्नीमाझारी ।
पिता पुसे, ‘हरि कोठें आहे ?’ स्तंभीं गुर्गुरी ।
प्रर्हादू पाचारी नरहरी, धांव लौकरी. ॥ विठ्ठले० ॥२॥
सती द्रौपदी पांडवजाया धरोनियां केशीम ।
सभेसी नेतां दु:शसन तो पापाची राशी ।
वस्त्र फेडितां, व्याकुळ झाली, घाबरली खाशी ।
मनोदूत धाडला तुजला आळ्वी कृष्णमाय ॥विठ्ठले०॥३॥
पतितपावन करुणासिंधु या नामासाठी ।
युगायुगीं अवतार धरुनियां तारिशी जगजेठी !।
अजामिळ ध्रुव वाल्मिक गणिका रिस वानर कोटी ।
तारावा हा मुकुंदराज येवढें अवघड काय । विठ्ठ० ॥४॥
पद २ रें.
तयाचें सुख सांगतांचि न ये । बोल गे ! बोल ग्रासिला बाईये ! ॥धुवपद.॥
सहज होती गोकुळीं नांदत । तंव तेथें आला गोपीनाथ ।
तेणें मजसीं करितां एकांत । मग मी सये ! राहिलें निवाम्त. ॥तया०॥१॥
तेथया चौघी होत्या बोलत । त्याही सये ! राहिल्या कुंठित ।
आनिकी चौधी पांचवी सहित । अलक्ष्येंसिं राहिलें तटस्थ ॥तया०॥२॥
तेथें दोघां एकमय झालें । त्धांचें कांहींच न चले ।
पांचांसहित निवांत राहिलें ऐसें सये ! मुकुंदें केलें. ॥ तया० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP