मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २८८ ते २९०

गोविंदकृत पदें २८८ ते २९०

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २८८ वें.

ऐक राया, भज रघुराजपायां ॥ध्रुवपद॥
ऐक तूं दैशीकपद, सुखदैक स्मरि, येकैक नमुनी, तैं कृपा तुज,
गै करुनि अढैक सुख देईल रघुविर ॥ऐक०॥१॥
नाम गा निजधाम पाहुनि, कामनाविरहीत हो मग, श्यामतनु विश्राम देईल, कामना पुरवील रघुविर ॥ऐक०॥२॥
रावणासह पुत्रविसुत, भूवनाप्रति धाडुनी तुज, सज्जना रक्षूनि सुरमुनि, भ्रमणा चुकवील रघुविर ॥ऐक०॥३॥
साकेतपुरनाथ जानकिकांत तव अपघाट चुकविल, नाथ नरहरि आप्त करि गोविंदपदयुग ध्यात रघुविर ॥ऐक०॥४॥

पद २८९ वें.

राज्यमदें शाश्वत मानसि आपणा पृथ्वीपाळा ! ।
नकळत नेइल काळ म्हणुनि हरिभजनी धरि चाळा ॥ध्रुवपद॥
मिथ्या वैभव दो दिवसांचें स्वप्नापरि पाहे ।
मागें मेले आतां पुढती मार्ग असा आहे ।
धन संपति हे समजुनि पाहतां दुपारी छाया हे ।
करिं श्रीहरिपदिं आस होऊनी दास धरीं पाये ।
दीननाथ तूं कृपा करुनियां तोडिं जन्ममरण ॥नकळत०॥१॥
छप्पन युगें लंकापतिचें राज्य भ्रष्ट झालें ।
चवदा कल्पें आय़ुष्य मार्कंडेयाचें सरलें ।
लोमेशादी भृषुंडि आनंत आयुष्यीं गेले ।
काळचक्र भ्रम नेत कोण बापा ! तेथ उरले ! ।
मोकळवृत्ति करि सर्वत्र एके स्थळीं गोळा ॥नकळत०॥२॥
अहंपणाचा गौरव तो रौरव दाविल नयनीं ।
न चलतसे बळ तेथें नये सांगातें हो कोणी ।
सत्सुकृत हे क्रियापराची दया हृदयभुवनीं ।
सत्वमतीनें हरिपदप्राप्ति निज अंत:करणी ।
शरणागत नरहरि यालागुनि झाला गोविदपदकमळा ॥नकळत०॥३॥

पद २९० वें.

सुमंत्रा ! कोठे आहे तो प्राणसखा श्रीराम । मनविश्राम ॥ध्रुवपद॥
ज्याचें ध्यान करी निरिजाधव । निशिदिनि स्मरतो नाम ॥सुमंत्रा०॥१॥
त्याविण पळ युगसम मज जातें । मम मानससुखधाम ॥सुमंत्रा०॥२॥
गोविंदाचा देशिक नरहरी । पुरवि मनांतिल काम ॥सुमंत्रा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP