गोविंदकृत पदें २३८ ते २४०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २३८ वें.
माझ्या द्दष्टि दाविला हंस बाई ! ।
ज्याला पाहतां त्रैलोकीं उपमा नाहीं ! ॥ध्रुवपद.॥
ज्याच्या तेजें ब्रम्हांड उजळलें ।
नाहीं त्याला हातपाय कानडोळे ।
न कळे हिरवें ना काळे पिवळें ढवळें ।
तयामाजी चमकते हिरे गळे ॥माझ्या०॥१॥
येउनि बैसला औट हात वृक्षमाथां ।
काय सांगुं मी त्या पक्षींद्राची वार्ता ।
द्दष्टी मुराली त्याजला पाहतां पाहतां ।
द्वैतभाव नाठवे माझ्या चित्ता ॥माझ्या०॥२॥
तेंचि ध्यान लागलें माझे चित्तीं ।
हालूं विसरलीं साजणी ! नेत्रपातीं ।
तंव पातली सद्रुरु नरसिंहमूर्ति ।
त्यानें धरुनी दिधले माझे हातीं ॥माझ्या०॥३॥
सद्नुरुरायें उपकार थोर केला ।
माझा हंस द्दष्टीनें दाखविला ।
आतां कैसें मी ग ! विसरूं त्याला ।
गोविंदाचा मनोरथ पुरवीला ॥माझ्या०॥४॥
पद २३९ वें.
मी आश्रित तुमचा । श्रीरामा ! ॥ध्रुवपद.॥
राजा तूं साम्राज्यपदाचा । त्राता विश्वाचा ॥श्री०॥१॥
इंद्रियग्राम स्वसत्ते आपुल्या वर्तविसी साचा ॥श्री०॥२॥
निर्मुनि जिय हे पालन करिसी । संहार जगाचा ॥श्री०॥३॥
सूर्य करी अनु तैसा हा जिव । या गोविंदाचा ॥श्री०॥४॥
पद २४० वें.
शरयूतिरवासा रामा ! । सत्वर येईं ! ॥ध्रुवपद.॥
हे करधृतकार्मुकबाणा ! कौसल्याजठरनिवासा ! ।
काकुत्स्था कैठभदमना ! कौशिकमुनिमानसहंसा ! ।
हेकमलदलायतनेत्रा ! मी बुडतों दे मज ढिवसा ॥
चाल ॥ कां अझुनि न येसी कैसा ।
कुठवरि तरि पाहसि तमाशा ।
कारा हरि सोडुनि पाशा ॥शरय़ू०॥१॥
खर दूषण त्रिशिरा रोषे, सहस्त्रावधि वधिले वार्णी ।
खळ खळ पिशिताशन त्यांच्या, प्राणांची केली बोहनी ।
खटपट चुकवीली मुनिची, सुखी केले या जनस्थानीं ॥
चाल ॥ खरि केली निश्चयवाणी ।
खग अरुणसुता उद्धरुनी ।
खाटीक विराधा दमुनि ॥शरय़ू०॥२॥
गौतमसती पदरजस्पर्शे शीळेची केली नारी ।
गाती तुज निगम प्रितिनें स्वच्छंदें गर्जति चारी ।
गंधर्व कलावत वाद्यें वाजविती नानाकुसरी ॥
चाल ॥ गो चेष्टविती मम शरिरीं ।
गोवियली वृति सारी ।
गंगेधरहृदयविहारी ॥शरय़ू०॥३॥
घनश्यामतनु सुकुमारा पहाया मन फार भुकेलें ।
घडि पल युगसम मज जातो श्रीरामा अंतर सुकलें ।
घडि घडि आयुष्य कमी बा ! झालें तुज कैसें नकळे ॥
चाल ॥ चित्स्वरूप दावीं सगळें ।
पहतांचि निवती डोळे ।
घेईन सुखाचे सोहळे ॥शरय़ू०॥४॥
नभगामि अमर सर्वहि तें, दशमुखकारागृहीं असतां ।
नारद विधि पाचारुनियां मुळ पाठविलें तुज ताता ! ।
न उपेक्षिसि प्रभु तूं त्यातें, पुरविली तयाची आस्था ॥
चाल ॥ नरहरि गुरुनाथ समर्था ।
न करीं गोविंदा परता ।
नामामृत चाखविं दात्या ॥शरय़ू०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP