गोविंदकृत पदें २१६ ते २२०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २१६ वें.
सांवळ्या तुझि मर्जी रे ! कोण तुम्हांला वर्जी ॥ध्रुवपद.॥
तूं रुसल्या मनजवर जी । तारक आन नसे विधिहर जी !॥सांवळ्या०॥१॥
मी विषयास्तव गरजी । आवडे सुतदाराधन घर जी ! ।
करि प्याद्याचा फरजी । तारीं गोविंदा नरहरजी !॥सांवळ्या०॥२॥
पद २१७ वें.
गोपीश्रमहरणा हरी ! येईं लौकरी सौख्यसदना ! ॥ध्रुवपद.॥
पडरिपु जाचिती नष्ट वाटती कष्ट सदा देहीं ॥
दुर्धर माझें अद्दष्ट झाले मति भ्रष्ट विठाबाई ! ।
वदवे तें वदलो स्पष्ट तुम्हांविण श्रेष्ठ कोणी नाही ।
टीप ॥ खुंटली मति श्रीपती वदावें किती दोषहरणा ॥गोपी०॥१॥
दु:शासन धरितां निरी निकळ सुंदरी दु:ख अनळे ।
मनदूत द्वारकापुरी धाडिला त्वरे तुम्हां पहिलें ।
होऊनि प्रगट अंतरी टाकी तिजवरी वस्त्र अनळे ।
मनदूत द्वारकापुरी धाडिला त्वरें तुम्हां पहिलें ।
हौनि प्रगट अंतरी टाकी तिजवरी वस्त्र अनळे ।
टीप ॥ घे चक्र दमाया करीं धाकती वैरी कंसकदना ! ॥गोपी०॥२॥
दुर्वास छळितां वनीं करी विनवणी द्रुपददुहिता ।
उभी राहुनि वृंदावनीं मनीं स्मरतां रुक्मिणीकांता ॥
पुढील भाने लवंहुनि येसि धांवुनियां श्रीमंता ! ।
टीप ॥ अघमर्षण करितां मुनि तृप्त करिसि तुं मधुसूद्ना ॥गोपी०॥३॥
प्रर्हाद गांजितां पिता तुम्हां अच्युता ! आळविलें ।
लागतां न लव खांबांत प्रगटतां क्रूर रूप धरिलें ।
त्यापरी मला नरहरी ! तारीं सांभाळीं वचन पहिलें ।
टीप ॥ गोविंददास उद्धरी ब्रीद सांभाळीं कुंदरदना ! ॥गोपी०॥४॥
पद २१८ वें.
जय जय जगदीशा ! । यदुकुलनलिनदिनेशा ! ॥ध्रुवपद.॥
इच्छित प्रेमघनाशा । देईं सकळ भवपाशा ॥जय०॥१॥
दुर्मद दनुजविनाशा ! । यदुपति देवकीजठरनिवासा ! ॥जय०॥२॥
गोविंदहृदयनिवासा ! । नरहरि योगीमानसहंसा ! ॥जय०॥३॥
पद २१९ वें.
सांवळ्या प्रभु नंदकिशोरा ! राजस दधिनवनीतचोरा ! ।
दीनजनसुखदायका कर्ममोचका विश्वविहारा ! ॥ध्रुवपद.॥
भवाब्धिपरतीर उतराया । येईं सत्वर यादवराया रे ! ।
घाबरला हा जीव धांव येथूनि मुक्त कराया ।
कधीं येशी देशिकराया । नेणवे कृतदोष हराया हो ! ।
कामक्रोधमदमत्सर जळचर जाचिती शरीरा या ॥
चाल ॥ खुंटला यत्न श्रीपती स्तब्धली मती शेषशयना ! ।
लाधली असे दुर्मति वदावे किति दोषहरणा ।
चूकवी सख्या दूर्गति राहुं दे प्रीति कमलनयना ! ॥
उठव ॥ कोण गती करूं या परिहारा ।
क्षणक्षणा क्लेश होत हारा ।
विगलित तनु सांवरीं येइं लवकरी नंदकुमारा ! ॥सांवळ्या०॥१॥
तारिले बहु पातकी जाणा । असें मज कळलें अज्ञाना हो ! ।
मी अपराधी तुझा दुजें मज करी सज्ञाना ।
अंगीं जडलें दुष्कृत नाना । ठाउकें तुजला स्वगगमना रे ! ।
दीनोद्धार असें ब्रिद पाईं सोडूं नको ध्याना ॥
चाल ॥ होणार तेंचि हो सुखें निकें वाटलें तुझ्या चित्ता ।
कर्मानुरुप हे मती गती गडली रुक्मिणिकांता ।
गेलि रे लाज यदुपति ! अतिशय झालें श्रीमंता ॥
उठाव ॥ नसे चित्त सुकृतदोरा । किति करणें बा येरझारा ।
जी ! आद्यवैद्य तूं खरा हरीं भवरोग देइं मात्रा ॥सांवळ्या०॥२॥
सुंदरानन पद्मदलाक्षा । सोय अरे अंतरसाक्षा हो ! ।
विद्वज्जनविश्रांता आतां ये सर्वाध्यक्षा ।
नका त्रासूं चित्तपरीक्षा । गुणज्ञा दे मजला भिक्षा ।
तूं सर्वांतरसाक्षी विलक्षण पद देईं अलक्षा ॥
चाल ॥ श्रीगुरुनाथ नरहरि धांव लौकरी सौख्यसदना ।
हौनि प्रगट अंतरी चित्त सांवरी अरिकदना ।
आरामवाटिका बरी हृदयमंदिरीं येइं सजना ॥
उठाव ॥ मना येईल तैसेंच करा । नका येऊं स्वामी निकरा ।
गोविंदप्रतिपाल बाल संरक्षी विश्वसूत्रा ॥सांबळ्या०॥३॥
पद २२० वें.
येई रे ! वृंदावनकुंजविलासिया रे ! ॥ध्रुवपद.॥
यदुकूलभूषण विश्वोद्धारा ! । राधिकाहृत्पंकजभ्रमरा ! ।
कारा चुकवीं यमाचिये हृदये निवासिया रे ! ॥येईं०॥१॥
कृष्णा ! नंदयशोदाबाळा ! । गाईगोपव्रजप्रतिपाळा ! ।
गोवर्धनधरणा नटनाटकवेषिया रे ! येई० ॥२॥
नरकविदारक नरकमोचना । नरशार्दूल मम दुष्कृतदहना ।
नमन पदीं गोविंदाप्रति देईं तव गुण विशेष या रे ! ॥येईं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP