गोविंदकृत पदें ३१४ ते ३१७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३१४ वें.
मारुतात्मजा ! कपिराया ! हो ! ॥ध्रुवपद॥
संकटी तुज आळवितां भावें । येसी धांबुनि सखया ॥मारु०॥१॥
तुजविण कोण असे मज त्राता । दात्या अंजनीतनया ! ॥मारु०॥२॥
सीताशोक हरुनि निजविक्रमें । भेटबिली रघुराया ॥मारु०॥३॥
गोविंदावरी करुणा करुनि । दावी निजपद सखया ॥मारु०॥४॥
पद ३१५ वें.
मारुतात्मजा कृपाब्धि तारी मज दीना ।
दुर्धर संकटीं वारी हारी यातना ! ॥ध्रुवपद॥
जानकीसंताप हरुनि सौख्य दाविलें ।
दुर्धर रजनीचर त्या स्वकरें मदिंले ।
सद्भावेंकरुनि रामचरण सेविले ।
महाप्रसाद लाधला प्रतापवर्धना ! ॥मारु०॥१॥
रामप्राप्ति व्हावयासि तूंचि कारण ।
भवाब्धिमाजि बुडतों मी येईं धांवुन ।
तारुं यांत मज नसे प्रभु तुम्हांविण ।
शरणागतवत्सल मां पाहि सज्जना ॥मारु०॥२॥
इच्चा परिपूर्ण कईम माझी नरहरी ।
रामीं प्रीति दे विशिष्ट हेंचि अंतरी ।
याविण मज इच्छा नसे तूं कृपा करीं ।
दास गोविंदास या दीनास उद्धरी ॥मारु०॥३॥
पद ३१६ वें.
नमुं सज्जन श्रोते । भाविक ! ॥ध्रुवपद॥
पंडित वैदिक शास्त्रिपुराणिक । मज अनुग्ग्रहकर्ते ॥भाविक०॥१॥
मति स्फूर्ति वचनाने । अनुसुख दाते ॥भाविक०॥२॥
गुरु नरहरीनें संतसभेप्रति । निरविलें हातें ॥भाविक०॥३॥
कर माथां ठेवुनियां पदरी । घ्या गोविंदातें ॥भाविक०॥४॥
पद ३१७ वें.
अहा ! दुर्दैवा त्वाम हें काय केलें ! । श्रीरामरूप मातें दुरवीलें. ! ॥ध्रुवपद॥
पोगंडदशा भरली माझे अंगीं । नाकळे तेव्हां कांहीं मजलागी ।
प्रवुत्तिमार्ग वर्तलों या जगीं । विषयानंद हाचि मन भोगी ॥अहा !०॥१॥
धनधान्यपुत्रपौत्रांची आवडी । लागली मना प्रपंचाची गोडी ।
केली बापा दु:संगाची जोडी । पडली पायी प्रपंचाची बेडी ॥अहा !०॥२॥
होतें पूर्वींचें मुकृत पदरी । अनायासें आले सद्नुरु नरहरि ॥अहा !०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP