अवधूतकृत पदें १४० ते १४३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १४० वें.
सखये ! मज घेउनि जाय तुं सद्नुरुसदना ॥ध्रुवपद.॥
नावडे सुत माहेर सासुर संपति सदना ।
नलगे हेमवसन भक्षण, जाळिलें मदना ।
पाहेना कधिं दाखवीं लौकरी, देशिकवदना ॥सख०॥१॥
घेउनि सखि चालिली वाटेनें दावित लक्षणा ।
नेउनि पुढें स्थीरत्व बैसवी तुयेंचे आसना ॥
त्यागवि देहकोश ते अवस्था करोनि अभिन्ना ।
पाहतां पाहतां मी न दिसें आपली आपणा ॥सख०॥२॥
देखतां द्दश्य देखणें, नाढळे, प्रकाश कोंदला ।
परेचा जो कां पवाडा, शब्दाचा मुका हौनि ठेला ॥
सुखाचा बहु सुकाळ मांडिला, भेद निर्वाळिला ।
अवधूतपण मोडुनि आत्मारामचि जाहला ॥सख०॥३॥
पद १४१ वें.
जय विद्याधीशा ! गणेशा ! ॥ध्रुवपद.॥
कुंजरतुंड उदंड सुखप्रद । झिरपत गंड अपार दयाद्रव. ॥
लंबोदर पीतांबर सुंदर । उंदिरवाहन पापविनाशा ! ॥जय०॥१॥
खंडित दुर्मति दंडि वितंडित । मंडित महिसुर पंडित वाहिती ॥
खंडित अघगण सांडित दुर्जन । कुंठित करि अभिमानविषा ॥जय०॥२॥
मालारतु विशालाधर कटीं । वाल दमरू त्रिशूलाधर करीं ॥
पाशांकुश सुमुखाला ध्याउनि । अवधुत अर्पित पदयुगी शिराअ ॥जय०॥३॥
पद १४२ वें.
सीतारमणा ! । रामचंद्रा ! हो ! ॥ध्रुवपद.॥
रामचंद्र निगमागम स्तवित । निजर्रगण अनुरत पद वंदिति ।
निपुणित मुनिजन कवि गुण वर्णिति । निरतिशय सुंदर करिं करुणा ॥सी०॥१॥
रजनिचरांतक रविकुलदीपक । राजिवनेत्र रमामनरंजक ।
मुनिमखरक्षक मदनजनक । सुखदायक दिनकरवंशाभरणा ॥सीता०॥२॥
पापविनाशन रिपुकुलशासन । भवतु वितोषण दुर्जनशासन ।
शांतिपदासन भ्रंतिविमोचन । निशिदिनी रत अवधुत तव चरणा ॥सी०॥३॥
पद १४३ वें.
जाइं जाइं रे ! । गुरुपदिं मन देईं ॥ध्रुवपद.॥
एकनिष्ठ परि निविष्ट हौनि । सृष्टिभाव द्दष्टीस न घेउनि ।
श्रेष्ठ वाक्य गुरुउच्छिष्ट सेउनि । वेष्टिसमेष्टी परता होईं ॥जाइं०॥१॥
कष्ट कार्य, त्यजि नष्ट काममोह । स्पष्ट पाहें निज स्पष्ट लोचनी ।
ज्येष्ठ स्वामी सनकादिक रमती । वसिष्ठ शुख वसती जे ठायीं ॥जाइं०॥२॥
अष्टभाव वरिं, अष्ट त्याग करीं । अष्ट प्राप्ती होति त्या अव्हेरीं ।
अष्टाक्षरि अविद्या मारुनि । अवधूत अखंड सुखी होई ॥जाइं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP