गोविंदकृत पदें १९६ ते १९८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १९६ वें.
लटपट पाउल ठेव । रे कूषकवहना ! ।
पदिं ब्रिद वाजति छुं छुं ॥ ध्रुवपद.॥
पीतपटीं तगटी जरि रत्नें । कोर प्रकाश चुं चुं ॥ लट० ॥१॥
मदसारोदक माथां वाहे । बिंदु स्रवति घन घुं घुं ॥ लट० ॥२॥
सिंदुवरदसुत सरितापतिचा । हरिली त्याची खुं खुं ॥ लट० ॥३॥
गोविंदाचे हृत्कमळीं तूं । सिद्धीरमणा घुं घुं ॥ लट० ॥४॥
पद १९७ वें.
गणपति विघ्नहरणा । मुनिहृत्तापशमना ॥ ध्रुवपद.॥
नंदिकेश्र्वरनंदन प्रभु सिंदुरासुरकंदनास्तव वंदुनी सुरवृंद मुनिगण मंद मंद स्तवोनि प्रार्थिति ॥गण०॥१॥
चंड करि मुख शुंड सरळ वितंड षड्दोदड सायुध लंड सिंधु वितंड फरशें मुंड धरुनी खंड करि गुरु ॥ गण० ॥२॥
बाळ तव पदिं भाळ ठेवुनिं आळ करि भवजाळ शमवुनि पाळ बहु लडिवाळ नरहरिदास नमि गोविंद गणपति ॥ गण० ॥३॥
पद १९८ वें.
हे माय अंबे ! । संकटीं रक्षीं तूं ॥ ध्रुवपद. ॥
बिंबाधरप्रिय सांबा करि मुखचुंबा । क्षणहि न विलंबे तुजला ॥ सं० ॥१॥
महिषासुरदमने अघशमने । स्मरणें तारिसि भक्तजनांला ॥ सं० ॥२॥
विश्र्वोद्भवस्थित्यंतरकरणे ! । गोविंददास म्हणवी तूं आपुला ॥ सं० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP