मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें ८३ ते ८६

रामकविकृत पदें ८३ ते ८६

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ८३ वें.

श्यामसुंदर प्रसन्नवदन मूर्ति हरिचि देखिली ॥ध्रुवपद.॥
प्राणापानसमता करुनि । सहस्रदळावरि पाहिली ॥श्याम०॥१॥
ज्ञानवैराग्य द्दश्य निरसुनि । बोधें हृदयीं ध्यायली ॥श्याम०॥२॥
द्वैताद्वैतभाव त्यजुनियां । त्रैलोकीं हे व्यापिली ॥श्याम०॥३॥
नवविध भक्ति आत्मनिवेदनीं । स्मृति हरिची प्रकाशिली ॥श्याम०॥४॥
राम म्हणे सद्भावेकरुनि । कृष्णचरणीं प्रीति जडली ॥श्याम०॥५॥

पद ८४ वें.

काय सांगूं तुज जिवा ! । हे बहु सोय धरिसि ना ? ॥ध्रुवपद.॥
माया ममता लोभ । सुख घेसी अहर्निशीं ।
आयुष्य गेलें विचार करिसि ना ॥काय०॥ १॥
आतां तूं ऐसें करीं । संतचरणी प्रेम घरीं ।
तेणें निजरूपी भक्ति कां करिसि ना ॥काय०॥२॥
आतां तूं ऐसें करी । संतचरणीं प्रेम धरी ।
तेणें निजरूपीं भक्ति कां करिसि ना ॥काय०॥३॥
राम म्हणे आतां । सर्व त्याग करुनियां ।
एक हरिचि स्मृति हृदयी धरिसि ना ॥काय०॥४॥

पद ८५ वें.

भज राम हरि । भवभय दूर करीं ॥ध्रुवपद.॥
बर्ह अमुत्र सुख वाटलेलें गोड । परिणाम विष मज तारी. ॥भज०॥१॥
काम क्रोध लोभ येणें मी संतप्त । नानापरि दु:ख जाले भारी. ॥भज०॥२॥
अहं आप्तवर्ग मोहजाल फार । आयुष्य गेलें दिनातें उद्धरी. ॥भज०॥३॥
भज आतां गोपाळा तूंचि कृपा करीं । मुक्ति देईं भय दूर करी. ॥भज०॥४॥
अच्युतसुत राम विनवितो । देवा ! भवाब्धितें उतरीं. ॥भज०॥५॥

पद ८६ वें.

कृष्णा ! रामा ! तव चरणीं लागो प्रीति ।
म्हणुनि आतां निजसुख दे कमळापति ! ॥ध्रुवपद.॥
काम्यकर्म करुनि सुखस्वर्ग प्राप्त जालें ।
क्षीण पुण्य होतां मर्त्यलोकीं जनन आलें ।
आशा भय तृष्णा येणें मज भुलविलें ।
यास्तव तुझे चरणी अंतर पडियेलें ॥कृष्णा०॥१॥
संसाराचा छंद लागला निशिदिनीं भारी ।
योषितेच्या संगें मन लुब्ध अनेकापरी ।
येणें येणें जाच जाला हो ! श्रीहरि ! ।
मी अपराधी मज दीनातें उद्धरी ॥कृष्णा०॥२॥
आतां गोपाळा मजलागीं प्रसन्न होईं ।
द्वैतभाव निरसुनि मुक्ति देईं ।
अहर्निशिं हृदयी प्रकाशक होईं ।
राम विनवितो चरणी सेवा घेईं ॥कृष्णा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP