गोविंदकृत पदें २५१ ते २५३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २५१ वें.
श्रीरामां ! नको विसरूं रे ! नको विसरूं । तूं माय मी लेंकरूं ! ॥ध्रुवपद.॥
अज्ञानांकुपी मी पडलों । कोठवरी तरि धीर धरुं ॥श्रीरामा०॥१॥
जननीविण बाळक परदेशी । नको मजला दूर करूं ॥श्रीरामा०॥२॥
तुजवांचुनि मज त्राता न दिसे । कवणाला मी स्मरूं ॥श्रीरामा०॥३॥
गोविंदप्रभु नरहरिराया ! । तूं सखकत्पतरू ॥श्रीरामा०॥४॥
पद २५२ वें.
श्रीरामा राजिवनेत्रा कोमलगात्रा ! ।
धांवें नगजापतिमित्रा ! ॥ध्रुवपद.॥
बुडतों भवगांगप्रवाहीं विषय निर पाहीं । न दिसे मज तारुं कांहीं ।
कामादिक दुस्तर जलचर दंशति देहीं । येथें उपाय दुसरा नाहीं ।
तूं कर्णधार गुरुराया ! सत्वर येईं । प्रभु तारी मज ये समयीं ॥
चाल ॥ दिनवत्सल ऐसें गाजे ।
निरुपम तव स्वरूप विराजे ॥
उठाव ॥ लवकर येउनि मज तारी सीताकलत्रा ! ॥धांवें.॥१॥
हा काम सबळ विषधरफणि दंशित शरिरा । विषयाच्या येती लहरा ।
दाटला कंठ मोहाचा झेंडू सैरा । परमार्थ गोड कडु सारा ।
संसार कठु प्रिय विषयपसारा । भवझेंडू देतो भंवरा ॥
चाल ॥ मांत्रिका गुरु रघुराया ! ।
निर्विषय करावी काया ।
ये सत्वर धांवुनि सदया ॥
उठाव ॥ विश्रम करिं तूं मज मुनिजनमानससूत्रा ! धांवें०॥२॥
अभिमानें पडलों आशाकारामाजी । कोधादिक दुष्टसमाजी ।
क्षणक्षणां जाचती मजला हे बहु पाजी । नव्हती परमार्थी राजी ।
श्रीमत्सद्रुरु नरसिंह तुम्ही ऐका जी लावा मज भक्तिपथा जी ॥
चाल ॥ पाळीव सारमय तूझा ।
नको त्यागूं गुरुमहाराजा ।
गोविंददीनाच्या काजा ॥
उठाव ॥ कनुवाळपणें तारावें मज अजपौत्रा ! ॥धांवें०॥३॥
पद २५३ वें.
माझ्या जीविंच्या जीवना आत्मारामा ! ।
भेट देईं राजसा मेघश्यामा ! ॥ध्रुवपद.॥
मज सोसवेना वियोग तुझा कांहीं ।
दीननाथा भेटि दे लवलाहीं ॥माझ्या०॥१॥
क्षणक्षणा होतसे जीव कष्टी ।
केव्हां पाहिन घवघवीत रूप द्दष्टी ?॥माझ्या०॥२॥
तुजवीण दुसरे नसे कांहीं ।
गोविंदासी एकदां दर्शन देईं ॥माझ्या०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP