मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २३१ ते २३२

गोविंदकृत पदें २३१ ते २३२

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २३१ वे.

राधामन उल्हासे । मंदिरीं बैसलीसे ।
तव विषयलहर करि कहर तिला लागलें कृष्णपीसें  ! ॥ध्रुवपद.॥
दूतीप्रति हंसगमना । म्हणे जाईं कुंजवना ।
तूं प्राणसखी मज जिवींची म्हणुनी तुजप्रति करितें करुणा ॥
यशोमतीबाळ कान्हा । दावी राजिवनयना ।
कोठवरी दु:ख करुं सहन, वेदना सोसवेना ॥
झाली विकळ चंद्रवदना । दूती गेली कुंजवना ।
करद्वय जोडुनि करी नमन सदनीं चाल जी कुंदरदना ।
चाल ॥ हे प्रभु यदुकुलतिलका ।
स्वामी मन्मथजनका ।
तूं प्रियकर मुनि सनका ॥
उठाव ॥ तुजविण दीन राधिका नसे शब्दाचा आवांका ।
म्हणुनि प्रार्थितें तुज ऐसें ॥राधा०॥१॥
दूतिवचन श्रवणकमळीं । ऐकुनियां वनमाळी ।
सवें गोपवृंदसमुदाय थाट विनटला हरीजवळी ॥
शृंगार गाईगवळी । करिं वंशदंड मुरली ।
कांसेसि पितांबर पिंवळा हार गुंजांची जसि पिंवळी ॥
श्यामतनूवरी पिंवळी । केशरी उटी लावियली ।
मस्तकीं केश विस्तीर्ण भाळीं कस्तुरी लावुनी काळी ॥
चाल ॥ पावन तोडर चरणीं ।
नृत्य पावन धरणीं ।
डोलती कुंडल श्रवणीं ॥
उठा ॥ इंद्रादि देवसमुदाय हरिदर्शनास इच्छितसे ॥राधा०॥२॥
सर्वांतर समसाक्षी । ज्या सत्ते पशुपक्षी ।
स्थावरजंगम वर्तति चराचर भवसागरीं रक्षी ॥
त्याच्या पदकमलाक्षी । रमली हे निगमसाक्षी ।
हिमनगजापति करि ध्यान, विधि जन्मला असे कुक्षीं ॥
ध्रुव प्रर्‍हादा अक्षी । दे गति चित्तपरीक्षी ।
पाहुनि  सुंदर हरि असा तिनें धरियेला हेतु मोक्षीं ॥
चाल ॥ दूति वदे  नंदकुमारा ।
श्रीकृष्णा सुकुमारा ।
धरीं व्याकुल ते अधिरा ।
तुजविण सद्नुणपात्रा ॥
उठाव ॥ हे कमलदलायतनेत्रा विचित्र होईल मज भासे ॥राधा०॥३॥
लगबग करि हरि तेव्हां । दूतिसह राघागेहा ।
येतांचि निरीक्षी सखी तसी लक्षिते वासुदेवा ॥
देवा दुर्लभ ठेवा । निज जन करि करि हरि धांवा ।
राधाकंठीं हस्त घालुनि देत चुंबन तिस बरवा ॥
रत्नजडित पर्यंका । त्यावरि यदुकुलतिलका ।
बसवुनि करी उपचार हारगंधादि दावी भावा ॥
चाल ॥ ते समाधिसुखनिद्रा ।
हरिसवें पद्मनेत्रा ।
मिनली सखी सत्पात्रा ।
नसे भिन्न उभयगात्रा ॥
उठावा ॥ गुरु नरसिंहपदकमलारविंदिं गोबिंदभृंग विलसे ॥राधा०॥४॥

पद २३२ वें.

साजणी न गमे मज बाई !
हरिवांचुनि जिवीं सुख ! ॥ध्रुवपद.॥
नग जड झाले नगापरि मातें । क्षणभरीं दावि पुरुषोत्तमातें ॥साजणी०॥१॥
हार गळां बहु भार असा हे । आभरणें सह साहीन साहे ॥साजणी०॥२॥
जाई दूति, नरहरिरुप दावा । गोविंदाचा प्राणविसांवा ॥साजणी०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP