गोविंदकृत पदें २०६ ते २०८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २०६ वें.
सद्गुरुराया । धन्य केलें जी ॥ ध्रुवपद.॥
अभयवरदकर शिरीं स्पर्शुनि मज । अरूपरूपा नयनीं दाखविलें ॥ धन्य० ॥१॥
जन्म सफळ भव निरसुनि दुसरेपण । माझें सर्व निरसविलें ॥ धन्य० ॥२॥
दीन गोविंदें शरण तुज येतां । स्वानंदामृत रस चाखविलें ॥ धन्य० ॥३॥
पद २०७ वें.
सत्कीर्तनआरंभीं मति दे स्वामी गुरु नरहरिराया ! ।
मी शरणागत तारीं वारीं दुष्कृत माझें ने विलया ॥ ध्रुवपद. ॥
नाहीं शुद्ध मुखांतील वाणी ज्ञान नसे शब्द वदाया ।
सत्संगति मज तेही न घडली व्यर्थचि गेलें वायां ॥ सत्की० ॥१॥
प्रर्हादास्तव स्तंभ विदारुनि होसी प्रगट दैत्य वधाया ।
मत्पतितावरि करुणा करुनी यावें कीर्तनीं लवलाह्या ॥ सत्की० ॥२॥
जें केलें दुष्कृत सकृत पदरीं नाहीं सुख सदया ।
हा संसार सुखप्रद मानुनि शिणविली आपुली काया ॥ सत्की० ॥३॥
अधमोद्धार न हे ब्रिदवाकी गर्जतसे प्रभुच्या पाया ।
दीन गोविंद तुझा शरणागत तार किंवा ने मज विलया ॥ सत्की० ॥४॥
पद २०८ वें.
कीर्तनीं येई रे ! अतिसदया । श्रीगुरु नरहरिराया ! ॥ ध्रुवपद.॥
कृपादृष्टिनें पाहीं मला । सच्चिद्रूपा अमला ।
कमला सेवितसे पदकमला । ठेवुनियां हृत्कमला ।
कमलोद्भवजनक ये हृदया ॥ श्रीगुरु० ॥१॥
दुस्तर भवसिंधूच्या जीवनी । बुडतों येईं निदानीं ।
करुणा कर पाणी, मज धरुनी। नेईं परात्परसदनीं ।
निशिदिनीं आठवितों तव पाया ॥श्रीगुरु० ॥२॥
बाळक मी तूझा मंदमती । दे चित्सुखविश्रांती ।
निगमागम गाती गुणकीर्ती । म्हणउनि मति दे स्फूर्ति ।
दीन गोविंद तुझ्या धरी पाया ॥ श्रीगुरु० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP