रामकविकृत पदें ९७ ते १००
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ९७ वें.
निजरूपीं सतत प्रीति धराना । नरतनुमाजी सार्थक कराना ॥ध्रुवपद.॥
सर्वं ब्रम्हा अनुभव घेउनि । निरहंकृति बोध असाना ? ॥निज०॥१॥
महावाक्या क्षराक्षर निरसुनि । भावबळे एक देव स्मराना ॥निज०॥२॥
हरिचि स्मृति ह्र्दयी धरुनि । जन्ममरण नाश कराना ॥निज०॥३॥
सन्दुरुभक्ति प्रेमे करूनि । राम म्हणे स्वसुख कां व्याना ॥निज०॥४॥
पद ९८ वें.
गुरुचें नाम मुखी सतत असावें । नलगे त्यास वैराग्य करावें ॥ध्रुवपद.॥
एकचि आत्मा द्वितीय नाहीं । अखंडित हें मनिं स्मरावें ॥गुरु०॥१॥
सगुण निर्गुण अवघा देव । ऐसें घ्यान ह्रदयीं धरावें ॥गुरु०॥२॥
राम म्हणे अनुभवेकरुनि । हरिचरणीं लीन असावें ॥गुरु०॥३॥
पद ९९ वें.
साधक हो हृदयी रामस्मरणा । तत्क्षणीं भवसिंधु तराना. ॥ध्रुवपद.॥
अहंममता लोभ विषय । याचा मनीं ध्यास सत्य ज्यांना ॥तत्क्ष०॥१॥
तत्क्षणी आसनीं भोजनीं । सतत निशिदिनिम भावबळेम हरिते भजाना ॥तत्क्ष०॥२॥
निरहंकृति नैष्कर्मयुक्त । भक्तिबळें हरिपूजा कराना ॥तत्क्ष०॥३॥
अध्यात्मबोध वैराग्य करुनि । आत्मा एकचि ध्यान धराना ॥तत्क्ष०॥४॥
सप्रेम भावें आनंदेंकरुनि । राम म्हणे गुरुसि शरण जाना ॥तत्क्ष०॥५॥
पद १०० वें.
हा बाई चिमणा गोपाळ गे ! ॥ध्रुवपद.॥
हा जगजेठी, हातीं काठी, यमुनेतटी, कवळ मुठी ।
गोपाळांतें करी लटापटी ॥हा बाळ०॥१॥
सुंदर वदन, कमललोचचन, श्यामवर्ण, दिसतो लहान ।
क्रीडा करीं सखे मिळुनि ॥हा बाळ०॥२॥
गोपिकांचे घरिं जाउन, गोपाळांसहित भक्षुन, कामरुपें प्रीति करून पलंगावरि स्वयें जाउन ।
मुखिं घेतो चुंबन ॥हा बाळ०॥३॥
हा मुरारि, कालिंदीतिरीं, कळंबावरी, परनारींचीं वस्त्रें चोरी ।
नग्न स्त्रियांतें देखोनि विनोद करी ॥हा बाळ०॥४॥
हा खिल्लारी, वृंदावनीं गाई चारी, तेथें येती विघ्नें भारी त्यातें आपस्वयें निवारी ।
ऐसें बहु विलास करी ॥हा बाळ०॥५॥
राम म्हणे हरीची लीला, अद्भुत कळा, भक्तजनांसि करी सोहोळा, शरण जावें या गोपाळा ।
त्यासि करी निर्भय काळा ॥हा बाळ०॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP