चिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १७२ वें.
आलाशी भ्रांति कसा जाणुनी । बरें पाहें विचारुनी. ! ॥ध्रुवपद.॥
रेत रक्त धातु असे मिळुनी । मूस बांधिलीसी गोठुनी ॥
नवमास ठेविलासे कोंडुनी । अमंगळ कोण याहुनी ॥आला०॥१॥
देह मळमूत्र यांचा गाळ रे ! कर्म भोगी जंजाळ रे ! ॥
फुटलें वासनेचें जाळ रे ! । तुज टपतो काळ रे ! ॥आला०॥२॥
चिन्मयनंदन प्रभुजीस रे ! जरी भावें भजसी रे ! ॥
संतासी करि याची पूस रे ! । तरि अव हा तरसी रे ! ॥आला०॥३॥
पद १७३ वें.
निशिदिनीं ध्यान तयाचें जडलें हृदयी ।
नाम तयाचें जपतां सुख होय तयी. ! ॥ध्रुवपद.॥
मुगुटी कोटि दिवाकर तेज प्रकाश सुढाळ ।
रत्नकिळावरि जडिल्या बहु दीप्ति झळाल ।
मोरपिसें वेष्टियलीं अति श्याम तमाल ।
केशर कस्तुरी तिलक रेखिला भाळ. ॥निशि०॥१॥
कुंडल तळपती मकराकृति ते श्रवणीं ।
पूर्ण प्रकाश मनोहर शोभा वदनीं ।
कमलदलाच उपमा साजे नयनीं ।
रतिपति पाहुनी रूप हे लज्जित मनीं ॥निशि०॥२॥
कौस्तुभमणि अति सुंदर तो विलसे कंठीं ।
कनककमळ तुळसीच्या माळा निजकंठीं ।
चर्चियली तनुवरि ते श्रीखंडौटी ।
पाहतां रुपं ऐसें हें भवभय निवटी ॥निशि०॥३॥
ह्रदयावरी तें विप्रपदांकित चिन्ह वरी ।
शंख चक्र अब्ज गदा पहा दिव्य करीं ।
नाभी विशाळ त्रिवलि विराजित उदरी ।
कटितटीं क्षुद्र घंटा गर्जति गजरी ॥निशि०॥४॥
पीतप हाटक तेंवि प्रकाश भला ।
चरणीं तोडर वांकी नखिं चंद्रकळा ।
ध्वजवज्रांकित चिन्हें पहा पादतळा ।
चिन्मयनंदन तेणें भावें र्मला ॥निशि०॥५॥
पद १७४ वें.
वृंदावनघनसंचारं श्रुति ! ॥ध्रुवपद.॥
गान विहारं तम दमनमप मारं. तत्पदमंदारम ।
विलसित रिक्षण सकल दुरितसंहारम, ॥वृंदा०॥१॥
वतारं भवसिक्षाकारं प्रोदाद्रुण भुवनैकसारम ।
भूतभयापहचहित च टित कर्तार्म ॥वृंदा०॥२॥
वृत्रारीमानस मधुपरि मारं वृंदारकयूथपमुदितमुदारम ।
वसु चिन्मयनंदन चिंतनमुदितं अखिलगोपवधुजम ॥वृंदा०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP