कृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १३६ वें.
भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी ! ॥ध्रुवपद.॥
श्यामसुंदरा ! ज अगदोद्धारा ! कृपाद्दष्टि न्याहळीं. ॥भक्तजना०॥१॥
ठाण पहुडें मुरली अधरीं । वाजवी कदंबातळीं. ॥भक्तजना०॥२॥
मोर मुगुटा शिरीं दिव्य कुंडलें । शोभे टिळक भाळीं. ॥भक्तजना०॥३॥
कामक्रोध मद मत्त कालिया । रगडीं पायांतळीं. ॥भक्तजना०॥४॥
आशा मनशा विषयवासना । मोहोजाळ समूळीं. ॥भक्तजना०॥५॥
गोप गोधनें. वनीं चारितां । दध्योदन करकमळीं. ॥भक्तजना०॥६॥
पापी अघासुर बकी पिंगला । उद्धरिल्या व्रजबाळी. ॥भक्तजना०॥७॥
कृष्णकिंकरा पाहीं कृपेनें । अभय हस्तें कुरबाळी. ॥भक्तजना०॥८॥
पद १३७ वें.
धन्य सद्रुरु कारागिर हा देखिला नयनीं ।
चिन्मय कंकण लेववुनि मजला नेलें निजभुवनीं. ॥ध्रुवपद.॥
अनंत जन्मिंचें सुकृत बाई ! होतें मम पदरी ।
अवचित गांठ पडली< त्याणें धरिलें मजल करीं, ॥
संनिद बैसुन द्दष्ट न्याहाळुन पद्महस्त शिरीं ।
ठेवुनि सहा गुरुनाथ दावी नवल कूसरी ॥
श्रवणी पेरिलें नयनीं उगवलें काय सांगूं परी ।
स्वात्मस्वरूपीं मन वेधलें निमग्न अंतरीं ॥
भक्तिहळद आंगीं मर्दुनी प्रेमगळसरी ।
सौभाग्याचें भाळी कुंकूं लाविली चिरी ॥
चाल ॥ घातलें ज्ञानांजन मम नेत्रीं ।
श्रवणी अनुभव बुगडी मळसुत्री ।
विवेक कोंदण केलें कडसुत्री ।
लागलें ध्यान अखंड ‘सोऽहं’मंत्री ।
टीप ॥ भाव विजवरा, दया सरी ही, स्वघर्म तनमणी, ।
तर्हेतर्हेचें भूषण मजला दिधलें साजणी. ॥धन्य०॥१॥
ऐक साजणी ! औट शिखरीं देखिली म्यां कळा ।
शांति ठुसी, विवेक टिका दिसे दिव्य गळां. ॥
अक्रोधाचें पद्क लेइलें जडित फांकली कळा, ।
अदंभची पेटया, अहिंसा शोभे बोरमाळा, ।
जितेंद्रियांचे काप कानीं, दिसे चंद्रकळा, ।
शम चूडा, दम पाट्ली. बोध टिकली भाळां, ॥
सप्त पुतळी अनुभव सूत्रें गुंफिली माळा, ।
चाल ॥ यम नेत्र हे विरवल्या तोडर ।
दम तितिक्षा जोडवी पोल्हार ।
उपरती बिचवे विरूपी सुंदर ।
सप्त पुतळी आनंद हातसर ।
टीप ॥ निवैरं केतक शिरीं विराजे चंद्रकोरवाणी ।
क्षेम राखडी, पूर्ण मूद दिधली श्रीगुरुंनीं. ॥धन्य०॥२॥
निर्गुणपुरिंचा सद्नुरु जोहरी देखिला नयनीं ।
जडाव कोंदण नग मजला दाखविलें त्यांणीं ॥
श्रद्धा मोतीं गुंफन भाळीं मस्तकिं रेखोनी ।
समाधी मोहनाळ दुल्लडी झालेला उन्मनीं ॥
चौंपुरुषार्थ करीं मुद्रिका चटक चांदणी ।
श्रवण मनन निजध्यास कंठा शोभे फुलवेणी ॥
शुद्ध सत्व हा चितांग कंठीं शोभे बहुगुणी ।
महावाक्याचे पंखे बाळ्या ल्यालें मी श्रवणी ॥
चाल ॥ शुद्धमति बाजुवंद कंकण ।
चंद्रहार परमार्थ हा जाण ।
निर्हेतु हे अलंकार पूर्ण ।
लेवुन सन्द्रुरुचरणी ई लीन ।
टीप ॥ जन्ममरण हा भ्रांति पडदा गेला निरसोनी ।
निश्वळ निवांत हौनि रत मी झाले गुरुचरणीं ॥धन्य०॥३॥
ऐसें अपार लेणें मजला सद्नुरुनेम लेवविलें ॥
द्वैतभयातें दुर सारुनी निजपद दाखविलें ॥
देहचतुष्टय पिंड ब्रम्हांडांतुन वेगळे केले ।
पंचभूत आणि त्रिगुण विषय सहज निरखिले ॥
उन्मनी शेजे जाउनि सखये ! सुखें पहुडल्यें ।
अद्भुत तेज पाहुन मन हें आत्मपदी रमलें ॥
सद्नुरुनाथ दया करुनियां अनिर्वाच्य केलें, ।
काय होऊं उतराई तयासि जीवन्मुक्त झाले ॥
चाल ॥ धन्य धन्य ती सद्नुरुमाउली ।
दीन व्त्सावरि धांवोनि आली ।
माझी मजला वस्तू दाविली ।
भक्तिवरली मुक्ति मज दिधली ।
टीप ॥ लेउन भूषण कृष्णकिंकर रतला गुरुचरणीं ।
‘त्वंपद’ ‘तत्पद’ सारुनि असि पदीं रमलों आनंदांनीं ॥धन्य०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP