गोविंदकृत पदें ३०१ ते ३०३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३०१ वें.
देईं अनुज्ञा रामा ! सौमित्रातें ! ॥ध्रुवपद॥
पूर्वी विधिवरदान असे त्या दुष्टतें ।
द्वादश वर्वें निरशन करी कष्टातें ।
इंद्रियनिग्रह निद्रा नसे श्रेष्ठातें ।
तोचि वधिल स्वबळें मतिभ्रष्टातें ॥देईं०॥१॥
इह लक्षणी अलंकृत लक्ष्मण प्रबळ असे ।
यापरि वीर हो ! रामा सृष्टीत नसे ।
त्यासि निरोपीं आतां लागलें पिसें ।
तुम्हा साध्य नसे तो स्वामी परिसें ॥देईं०॥२॥
होतां फार विलंव पुढें असाध्य तुम्हां ।
हें मद्वाक्य परिसें मनविश्रामा ।
या दुष्टातें शमवी आत्मारामा ।
गोविंद दास विनवी तुज मेघश्यामा ॥देईं०॥३॥
पद ३०२ वें.
कपींद्रा ! दाविं मला तूं दाशरथी रघुनार्थ । जानकीकांत ! ॥ध्रुवपद॥
रैव्कुलभूषण इतखरदूषण । निजजनमनविश्रांत ॥जानकीं०॥१॥
दशरथनंदन दशमुखकंदन । मुनि हृत्कमळी ध्यात ॥जानकीं०॥२॥
दीन गोविंद तुम्हां विनवितो । जोडुनि दोन्ही हात ॥जानकीं०॥३॥
पद ३०३ वें.
धन्य दिवस आज साधुसंग लाधला ।
सर्वहि शुभयोग पर्यकाळ साधला ! ॥ध्रुवपद॥
दुर्लभ सत्संग आम्हांविषयी मानवा ।
स्त्रीकलत्रपुत्रमित्र आवडे जिवा ।
अर्थसंग्रहार्थ नित्य सोस हा नवा ।
हाचि या मनास वेह्द प्रबळ लागला ॥धन्य०॥१॥
मान्यता असावि या जनांत चांगली ।
विषयवासनेंत वृत्ति फार रंगली ।
आवडे मना तसीच बुद्धि वागली ।
पाहिला विचार म्यां कधीं न आपुला ॥धन्य०॥२॥
तार या भवाब्धिपार करिं नरोत्तमा ।
भूमिभार झालों वृथा पाव उत्तमा ।
मग दुष्कृत फार रक्षिणार तूं अम्हां ।
दास गोविंदास पदविलास दाविला ॥धन्य०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP