श्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १६३ वें.
सर्व घटीं व्यापक गडया ! रे वळखुन घेई हरी ।
भरला सबाहय आणि अंतरीं. ! ॥ध्रुवपद.॥
देतां घेतां चालतां ऐकतं तुमच्या सवें वागतो ।
अवस्थात्रयांत जो जागतो. ॥
गुणातीत निर्गुण निरंजन अरुप रूपी लागतो ।
त्याचे वर बसे चालत बोलतो ॥
चाल ॥ क्षण एक वैस तूं शब्द एकीकडे ।
,मग तूं पाहूं नको गडया ! कोणीकडे ।
हें मनसेंद्रिय तुझें हरिपदीं जडे ॥
टीप ॥ ब्रम्हा रोडडे होसी तूंचि तूं कांही न उरे उरी ।
हृदयी चिंतन गुरुचें करीं ॥सवें०॥१॥
तेथें गंगा झुळझुळ वाहती पिऊं नको तूं पाणी ।
ऐकुं नको गोष्ट कुणाची कानीं ॥
जोर बहुत तो घोर जिवाला स्थीर ठेवितां हानी ।
उलटे दोर होती ती श्रेणी ॥
चाल ॥ मग गुरुकृपेनें वेगें जाशी नभा ।
तेथें पाहसी सखया ! कोटिरवीची प्रभा ।
हा मार्ग गुरुविण इतरांसी सुभा ॥
टीप ॥ अनंत जन्मीचें पातक विखरे भेटतांचि श्रीहरी ।
कोटी कुळें स्वयें उद्धरी ॥सर्व०॥२॥
चाले ना बोले डोले वय कीं फिरुन ये सत्वरीं ।
घाबरे निर्जल सरोवरी ॥
जसा तळमळे मीन जळाविण मधुमासा अंतरीं ।
तसा मग उतरत कूपांतरी ॥
चाल ॥ तेथें पंचविषय आंत साजिरे ।
मध्यें अक्षय फिरती षडरिपु जलचरें ।
निघूं देती न कोणा आंतुन बाहेरी ॥
टीप ॥ कर्णधार कर धरोनि वोढी बाळसखा सत्वरी ।
श्यामतनयाचा साहयकारी. ॥सर्व०॥३॥
पद १६४ वें.
गोटा पडो या पोटावरता हीन दैवाचा वांटा ।
दादला मिळाला करंटा. ! ॥ध्रुवपद.॥
पांच वीस लांकडें मिळवुनी बांधियलें झोंपड ।
तीन धारण एकचि आडा ॥
आंत मध्यें अंधार वरी दिसे उजेड ।
वरोनी वारा येतो गोड ॥
रविशशिचांदण्या दिसती नेत्राविण चोखटा ॥दादला०॥१॥
चिखल घरामध्यें अक्षय होतो वरुन वाहे पाणी ।
झोंप न लागे रात्रंदिनीं ॥
चोर घरामध्यें फिरून जाती आंत दिसे केरसुणी ।
फुटकी दुजी असे बरणी ॥
पळुन जावयालालागीं दिसती पुष्कळ मोठया वाटा ॥दादला०॥२॥
विश्वामित्रीं गलित गात्रीं रदनाविण तृण खाया ।
स्वप्रामध्यें देती पपा ॥
कान मान ज्या दांडी नाहीं ऐसा होता हाय ।
चंचळ उडून नभासी जाय ॥
ढोल टाळ पखवाज झांजिर्या सदोदित वोभाटा ॥दादला०॥३॥
सुवर्णाचे पांच मिळेना मंगळसूत्रा मणी ।
जाहला फुकट जीवाला धणी ॥
परदेशामध्यें एकट जातो टाकुनी आम्हा वाणी ।
सांगावें दु:ख कोणालागुणी ॥
श्यामसुतासी आनंद वाटे हर्ष न मावे दु ओंठा ॥दादला०॥४॥
पद १६५ वें.
रामकथारस घेईं रे । प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
रामकथामृत शंकर घेउनि । शीतळ झाला देहीं रे ! ॥प्राण्या०॥१॥
वाल्हया वाल्मिक रामरसानें । अमर झाला तो पाहीं रे ! ॥प्राण्या०॥२॥
श्यामसुत म्हणे कितीक तरले । जनकादि झाले बिदेःई रे ! ॥प्राण्या०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP