चिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १६९ वें.
सकळहि पावन होती । या हरिनामाच्या गजरें. ! ॥ध्रुवपद.॥
वेदपठण आणि शास्त्रपुराणें । अर्थसहित सग होती रे ! ॥या०॥१॥
विणाझल्लरीटाळमृदंग । श्रुतिस्मृतिही छंदे वाजती रे ! ॥या०॥२॥
दुर्जन दुर्मति स्त्रिया पुरुष कीं । तरतिल कुक्षळ याती रे ! ॥या०॥३॥
चिन्मयनंदन या संतांच्या । चरणिंची वंदिल माती रे ! ॥या०॥४॥
पद १७० वें,
आळवितों तुज भावें । पांडुरंगे ! लौकरी धांवे पावें. ! ॥ध्रुवपद.॥
हृदयभुवनीं आठवा । हेंची वाटे केवळ जीवन माझें. ॥आ०॥१॥
दीनोद्धारणे ! सांवळे ! अनाथनाथे ! । तुजवीण सोयरे कोण मातें ? ॥आ०॥२॥
साच करणें आपुल्या विरुदासी । सांभाळावें चिन्मयनंदनासी. ॥आ०॥३॥
पद १७१ वें.
हरिला तुम्ही साजणि ! जाउनि आणा । जिव जाइल जाणा ।
न गमे क्षण हरिविण जाणा । नग भासति सम पाषाणा. ! ॥ध्रुवपद.॥
जो मुनिजनसुकारी । शोकदुरितां परिहारी ॥
लोकाम भवसिंधुपार उतारी । गोवर्धनधारी ॥
खेळे गोपाळ कसा परिवारीं । मधुकंस विदारी ॥
दंडन करी उदंड रिपुशिं मार्तंडसुतनयापुलिनविहारी ॥हरि०॥१॥
पति कां रुसले वो ! मज भाजी । पति माझ्या काजीं ॥
जाय तुं झडकरि काय करिल हरि पाय धरुनि उपाय करीं सखी ॥हरि०॥२॥
मैमा न कळे वो ! बाई ! । महिमा लागुनि हरिपायीं ॥
सुहिमाचलतनयावर पाहीं । अहिरिपु त्या नाहीं ॥
त्या नामस्मरणें भवभय नाहीं । करुं मी वो ! काइ ?॥
वदन वदत हरिवदनापेक्षुनि मदनजनकपद वंदिन वद हे ॥हरि०॥३॥
करितें हरितें निजध्यासा । परि ते त्यजिली मम आशा ॥
धरितें तव चरणीं द्दढविश्वासा । करि हरि सहवासा ॥
गुरु चिन्मयनंदन विठ्ठलदासा । सुखी केला जैसा ॥
श्याम सगुण सुखधाम मनोविश्राम समागम करि सखी. ॥हरि०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP