गोविंदकृत पदें २९८ ते ३००
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २९८ वें.
कपीद्रा ! सुखी आहे कीं जानकीमनविश्राम । सर्वसुखधाम ! ॥ध्रुवपद॥
विश्वोद्भव पालन संहारण । हेंचि असे निजकाम ॥कपीद्रा०॥१॥
मी निर्गुण सगुणत्वा आणुनि । दाखविला गुणमान ॥कपीद्रा०॥२॥
शिशु गोविंद संगें घेउनि । पाजीं सुखामृतनाम ॥कपीद्रा०॥३॥
पद २९९ वें.
राया जमकाची वैदेही । श्रीरामा देईं ! ॥ध्रुवपद॥
त्यागीं रजनीचर कानन दहिता । पद्माक्ष दुहिता ।
स्वहिता सांभाळीं किल्विषरहिता । ऐकें नृपनाथा ।
समजा, त्रैलोक्यपतिची वनिता । जगतीची माता ।
न धरिं अभिलाष हिचा तूं हृदयीं ॥श्रीरामा०॥१॥
इच्छामात्रें इच्छेनं इनें नाचविले । प्रेमें खेळविले ।
होते जे निर्गुण सगुणा आले । ईच्या गुणलीले ।
ते हे मुक्त करीं लागुनि पायी ॥श्रीरामा०॥२॥
राया ! तूं त्यागी सर्व दुराशा । न धरावी आशा ।
केली वंशाची काय निराशा । पावति हे नाशा ।
चुकवीं तूं काळरिंच्या पाशा । आर्जविं जगदीशा ।
गोविंद प्रभु हृदयांतरीं ध्याईं ॥श्रीरामा०॥३॥
पद ३०० वें.
सोडिना जसे तसेचि हो सुखें पुढें ।
यश अपयश पूर्वसंचितें घडे ! ॥ध्रुवपद॥
पूर्वीं परमळे असुर तूं स्वबोधिला ।
हौनि तूं जळीं मीन दैत्य मारिला ।
मंदराद्रि पृष्ठिं धरुनि सिंधु तारिला ।
कोडरूप धरुनि हिरण्याक्ष मर्दिला ॥सोडिना०॥१॥
वधिला दिग्गजेंद्र धरुनि सिंह आकृति ।
त्याचा प्रपौत्र वळी प्रवळ ये क्षितीं ।
स्थापुनि पाताळी त्यास लावुनि प्रिती ।
सहस्रार्जुन बघुनि त्यास दिधली सद्नती ॥सोडिना०॥२॥
आतां मी जिंकीन तुज स्वबळें राघवा ।
घेइन स्वस्थान तुझें रे सीताधवा ! ।
न करीं अनुमान पाहुं हस्तलाघचा ।
गोविंद प्रभु करी संधान तेधवां ॥सोडिना०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP