मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २४५ ते २४७

गोविंदकृत पदें २४५ ते २४७

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २४५ वें.

श्रीराम मंगलधामा । योगीजनमनविश्रामा  ! ॥ध्रुवपद.॥
वियोग तुझा मज जाचे । लागलें ध्यान स्वरूपाचें ॥श्रीरामा०॥१॥
ठेवुनि कर निढळावरता । पाहतों वाट रघुनाथा ॥श्रीरामा०॥२॥
स्मृति होतां मन झुरताहे । उपाय नसे करुं काये ॥श्रीरामा०॥३॥
गोविंद दीनाची करूणा । ऐकावी सीतारमणा ॥श्रीरामा०॥४॥

पद २४६ वें.

श्रीराम मंगलधामा । गुणग्रामा  आत्मारामा ! ॥ध्रुवपद.॥
आम्हां टाकूनि परदेशी । झालासि निरंजनवासी ! ॥श्रीरामा०॥१॥
वियोग तुझ्या स्वरुपाचा । साहेना सत्य त्रिवाचा ॥श्रीरामा०॥२॥
स्मुति होतां मन झुस्ताहे । उपाय नसे करुं काये ॥श्रीरामा०॥३॥
गोविंद दीनाची करुणा । ऐकावी सीतारमणा ॥श्रीरामा०॥४॥

पद २४७ वें.

माझ्या सांवळिया श्रीरामा राजिवलोचना रे ! ॥ध्रुवपद.॥
सीतापति शरयूतिरवासी । योगीमानसकमलप्रकाशी ।
कांसी धरि त्या भवनिधि पार उतारणा रे ! ॥माझ्या०॥१॥
रविकुलभूषण जगदुद्धारा । नामें शंकरदाहविदारा ।
उलटे भजनीं करिसी वाल्मिक पावना रे ! ॥माझ्या०॥२॥
पाशीं गुंतलों या भवजाळीं । टाळीं दुस्तर ते हे काळीं ।
भाळी वंदुनि नरहरि करितो करुणा रे ! ॥माझ्या०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP