कृष्णदासकृत पदें ३१ ते ३४
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३१ वें.
मनीं श्रीपाद आठवा । धरुनि श्रद्ध रति भक्तिभावा हो ! ॥ध्रुवपद.॥
होता निर्गुण निर्विकार । झाला सगुण साकार ।
भक्तां प्रेमें निर्धार । त्यासि आवडे भोळी सेवा हो ! ॥मनीं०॥१॥
‘गुरुचरित्र’ कामधेनू । पठणीं ज्याचा नित्य नेमू ।
त्याची होइल पूर्ण कामू । हयणेनियाम त्वरें गावा हो ! ॥मनीं०॥२॥
हरुनि सकल आपदा । नेइल आपुलिया पदा ।
कृष्णदासा छंद सदा । दासासाठीं केला धांवा हो ! ॥मनी०॥३॥
पद ३२ वें.
मोरया ! तुला कशी माझि दया नाहिं रे !॥ध्रुवपद.॥
या भवतापें बहुत मी तपलों चरणीं ठेवियली डोई रे ! ॥मोरया०॥१॥
भार्यासुआदि मोहिं गुंतलों । मुक्त करिलवलाहीं रे ! ॥मोरया०॥२॥
कृष्णादास हा गुरुकृपेनें । आवडिनें नाम तुझें गाई रे ! ॥मोरया०॥३॥
पद ३३ वें.
गगनिं घडड घन गरजे ।
चमचमात चमकतसे चपला ब्रजजन कांपे ।
थर थर थर धर वाजे ॥ध्रवपद.॥
मथुरा गोकुल व्रज वृंदावन !
जलमय होऊनि बुडे सकल जन ।
उन्मळोनी तरुवर खालीं पडती ।
वायु सुटला सणणणणण भर भर भर वाजे ॥गगनिं०॥१॥
इंद्र कोपला महा भयंकर मुसलधारीं पर्जन्य वर्षतो ।
अडखळोनि गोप गाई पडति धरणीं ।
नाद धुम घणणणण घड घड वाजे ॥गगनिं०॥२॥
त्या समयीं स्थूल गिरी गोवर्धन ।
नखाग्रीं उचलुनि धरी सकल जन ।
कृष्णदास करित नमन अर्पण ।
शिघ शिव शिव शिव हर हर हर हर गिरेजेश्वर ॥गगनिं०॥३॥
पद ३४ वें.
पाइ मन ठेवीं रामपाईं ॥ध्रुवपद.॥
वेंचिलें आयुष्यनाणें । जोडिलें विषयसुख तेणें ।
न सरे येणेंची जाणें । पडशील अपायीं ॥पाईं मन०॥१॥
अपवित्र देह जाण । अविद्येचे जाण पण ।
श्रीहरिभजनावीण सोडूनियां देईं ॥पाई मन०॥२॥
कृष्णदासप्रभुविण । येथें तुझा सखा कोण ।
तुला श्रीरामाची आण । विचारुनि पाहीं ॥पाई मन०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP