मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
कृष्दासकृत पदें २० ते २३

कृष्दासकृत पदें २० ते २३

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २० वें.

सांवळिया राधारमणा ! । काम नयेदीनाची करुणा ? ॥ध्रुवपद.॥
किती अंत पाहसी सदया ! । मनमोहन यादवराया  !।
कशी निष्ठुर केलीस माया । मी शरण आलों तव पायां ॥
येईं झ्डकर पन्नगशयना ! । कां नये दीनाची करुणा ॥सांव०॥१॥
देवा ! कृपासिधु म्हणविसी । अजी क्रूर कां हरी ! मजविशीं ।
मां पाहि हरी ! हृषिकेशी ! । हा पतित दीन अघराशी ।
धांव वेगी कैजलोचना ! । कां नये दीनाची करुणा ॥सांब०॥२॥
वहु जन्म संसूतिफेरा । चौर्‍यायशीं गणित येरझारा ।
मोहोजाळ, ममताभंवरा । मज ओढिती तृष्णाविवैरा ॥
कर दया ! मुरलीवादना ! । कां नये दिनाची करुणा ॥सांव०॥३॥
तारिले अजामिळ गणिका । ध्रुव वाल्मिक गजेंद्र गुहका ।
त्यांहुन मी पतीत हो कां । परि तारीं आतां विधिजनका ! ॥
किती आळवूं भक्तभूषणा ! । कां नये दीनाची करुणा ॥सांव०॥४॥
दनिबंधू हें नाम साचें । वर्णिती आगम श्रुति वचे ।
आजी सत्य करीं ब्रीदाचें । माउअलीपण कृपेचें ॥
कृष्णदास लोळे चरणा । कां नये दीनाची करुणा ॥सांव०॥५॥


पद २१ वें.

कृष्ण ! धांव गडया ! मनमोहना ! । कां नये माई करुणा ॥ध्रुवपद.॥
दीन अनाथ मी कंसारी ! । तारीं आतां भवपुरीं ॥
श्यामसुंदरा ! श्रीहरी ! । मर्दीं षडिपु वैरी ॥
तुजवीण क्ण त्राता पुतनारी ! । ये सत्वर जडकरी ॥
पाहसी अंत किती गिरिधारी ! । छछिती दुर्जन वैरी ॥
मां पाहि आतां कृपाघना ! ॥ कृष्णा ! धांब गडय० ॥१॥
पतीतपावन हें ब्रिद आतां । सोडी मदनताता ! ॥
वर्णिती श्रुतिस्मृति अनंता ! । रुक्मिणीच्या कांता ! ॥
देवा ! घालीं उडी भगवंता ! । वत्सालागी माता ॥
तुजविण कोण मला उद्धरिता । सांग कृपावंता  ! ॥
अंकी घेईं मला मधुसूदना ! ॥ कृष्णा ! धांव गडया० ॥२॥
करूणासागरा ! हरी ! दयाळा !  मनमोहन कृपाळा ॥
पापी पारियलें अजामिळा । गज गणिका अहिल्या शिळा ॥
स्मरतां द्रौपदी अबळा । पावलासि घननीळा ! ॥
प्रल्हाद उपमन्यू ध्रुव बाळा । स्थापिशी पदी अढळा ॥
चाल लोकरी रिपुदमना ! ॥ कृष्णा ! धांव गडया० ॥३॥
केशवा ! अनंता ! श्रीर्गा ! । मुनिजनमानर्सेभृंगा ! ॥
अचख अद्वत अभंगा । पावें पांडुरंगा ! ॥
घेईं झडकरि ओसंगा । निरसी संसृतिदंगा ॥
देईं निशिदिनीं सत्संगा । कृष्णदास भणंगा ॥
दे ठाव अक्षयी निजचरणा ॥ कृष्णा ! धांव गडया०॥४॥

पद २२ वें.

धांव रे ! द्त्तराया ! सहयाद्रिवासी अत्रितनया ! ।
त्रिविध तापें तापलों मी करा कृपेची छाया ॥द्गवपद.॥
चौर्‍यायसीं लक्ष योनी फेरे फिरलों देवा ! ।
भवसागर खळ भारी, अंत न लागे जिवा ।
यांतुनि काढीम आतां येऊं दे ह्रदयी कणवा ।
षडिपु जळचरी यांणीं मांडिला दावा. ।
आतां येईं झडकर, नको करूं निष्ठुर माया ॥धांव०॥१॥
तुजविण मज कोणी नाहीं आसरा त्रिभुवनीं ।
काका, मामा, बंधु, बहीण तूंचि जनक जननी ।
कृपाद्दष्टीं पाहीं आतां कुळंबिण बाळालागोनी ।
पतीतपावन हें नाम गर्जे वेदवाणी ।
दीनानाथ जाणोनीयां येईं त्वरें देवराया ! ॥धांव०॥२॥
निर्गुण निर्विकार निरंजन रहिवासी ।
भक्तजन तारावया सद्नुणरूपातें धरिसी ।
भक्तजनत तारावया सद्नुणरूपातें धरिसी ।
त्रैमूर्ति होऊनियां स्वच्छंदें विचरसी ।
भागीरथीं स्नान संध्या, गम्ध लावी पंढरीसी ।
कोल्हापुरीं भिक्षा घेऊन भोजन पंचगंगे ठाय ॥धांव०॥३॥
दिव्य रूप सुंदर कांति, माथां शोभे कठाभार ।
शंख चक्र गदा पद्म कर्णी कुंडळ मकराकार ।
वैजयंती वनमाळा, कासे शोबे पीतांवर ।
कोटी रविसम तेज मुगुट दिसे तेजाकार ।
अतसिकुसुमसम दिसे सुंदर काया ॥धांव०॥४॥
माहुरगडीं निद्रिस्थ मेरुशिखरीं आसन ।
जप तप ध्यान मुद्रा सहन ।
लीला ज्याची पूर्ण स्मरगामी दर्शन ।
ऐसें पहा दैवत हें नाहीं त्रिभुवनीं आन ।
कृष्णदास अनन्य भावें लागे श्रीगुरुदत्तपायां ॥धांव०॥५॥


पद २३ वें.

काय कऊं वो बाई ! हृदयीं । व्यापिली विठाई ॥धृवपद.॥
मावळली इव्षयांची चिंता देहीं । देह विदेहीं ।
श्रवणीं नयनीं वदनीं । मनाशिं न रुचे कांहीं ॥काय०॥१॥
प्रापंचिक व्यवहारीं असताम हिंडे दिशा दाही ।
बसतां उठतां येतां जातां । कोठेही मन नाहीं ॥काय०॥२॥
कृष्णदास करुणाकर जननी । निजभक्तां सुखदाई ।
सुख त्याहुनी सद्नुरुभजनीं । रत मानसी हें निज ठाईं ॥काय०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP