रामकविकृत पदें ११९ ते १२२
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ११९ वें.
राम सीतापति ध्याउं याया ॥ध्रुवपद.॥
दशरथनंदन राजिवलोचन । सगुण मूर्ति ध्यान पाहुं या या ॥राम०॥१॥
सप्रेम भावें पूजन करोनि । अहंभाव पुष्पांजलि वाहुं या या ॥राम०॥२॥
सर्वत्यागें द्दश्य निरसुनि । निरंतरीं अंतरीं स्मरूं या या ॥राम०॥३॥
राम म्हणे देवाचरणीं प्रीति । अखंडित भक्ति तुझी करूं या या ॥राम०॥४॥
पद १२० वें.
निज घन स्वरूप तुझें रुप गुरुराया ! ।
बुदिनेव पाहतांचि द्दश्य गेलें लया ॥ध्रुवपद.॥
एक हरि प्रकाशला द्वैत कोठे नाही ! ।
ऐसि ज्यासि प्राप्ति होय तोचि मुक्त पाहीं ॥तुझें०॥१॥
तुझी कृपा व्हावी म्हणुनि साधन करितातीं ।
नेतिनेति वदुनियां श्रुति मौन धरिती ॥तुझें०॥२॥
अहंभाव जिव शिव आहे सर्व भ्रम ।
माया नाहीं नाहीं अवघा आत्मराम ॥तुझें०॥३॥
राम म्हणे गुरुपदी अनन्य शरण ।
न जाणुनि प्रेमभावें भक्ति करीन ॥तुझें०॥४॥
पद १२१ वें.
लवकरि यावें हो ! गोपाळा । मधुसूदना ! घननीळा ! ।
श्रमलों संसारी अपार । मज दीनातें उद्धरी ॥ध्रुवपद.॥
विषयसर्पे हो ! डंखिलें । तेणें मन भ्रमलें ।
निशिदिनिं तळमळ । बहु आहे कृपाद्दष्टि पाहें ॥लव०॥१॥
देहाअभिमान सौजन्य । आयुष्य गेलें जाण ।
आतां गति कैसी श्रीहरि । भवसिंधूतें उतरीं ॥लव०॥२॥
ऐसा मोहो हा असे फार । बुद्धि नाहीं स्थिर ।
काळ ग्रासिल भय भारी । जन्ममरण वारीं ॥लव०॥३॥
राम विनवितो अनत्य । भक्तिभावेंकरुनि ।
कृष्ण महाराजा वनमाळी । शेवटीं मज सांभाळीं ॥लव०॥४॥
पद १२२ वें
सतत मुखी वदेव कृष्ण नाम । त्याचा नासे अज्ञान सर्व भ्रम ॥ध्रुवपद.॥
एक आत्मा ऐसा बोध जाला । तोचि भवसागर तरला ॥सत०॥१॥
हरिची सत्ता हृदयी प्रकाशली । तेणे क्रियमाण संचित भस्म जालीं ॥सत०॥२॥
सर्वभूतीं देव भक्ति करी । येणें जन्ममरण निवारी ॥सत०॥३॥
राम म्हणे शरण देवा तुज । दीननाथा ! कृपा करीं मज ॥सत०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP