नामदेवकृत पदें ५४ ते ५५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ५४ वें.
कान्होबाची संगती ब्रम्हादिक इच्छिताती धन्य ।
आम्हा म्हणती । आलललल रे ! ॥ध्रुवपद.॥
अजगर मारिला वणवा गिळिला, ।
गोवर्घन उचलला अबबबब रे ! ॥का०॥१॥
मामा मारुं गेलासी । आपटलें गजासी; ।
मुल्लयुद्ध खेळशी । हुतुतुतु रे ! ॥का०॥२॥
पूतनेसी तारिलें । अहाहाहा रे ! ॥का०॥३॥
गवळ्यांच्या घरीं जाशी दुग्धलोणी खाशी, ।
त्यांच्या सुना तूं भोगिशी । छीछीछीछी रे ॥का०॥४॥
मुरली घेउनि सत्वरी । जाशी यमुनेतीरीं ।
वाजवीशी नानापरी । रुनझुणरुझुण रे ! ॥का०॥५॥
यमुनाडोहीं पोहतां । काळिया सर्प तेथें होता.
नाचतसे त्याचे माथा । थै थै थै थै रे ! ॥का०॥६॥
गोपी गेल्या स्नानाशी । वस्त्र वृक्षीं ठेवीशी ।
नागव्या त्यांना नाचविशी । अरे रे रे रे ! ॥का०॥७॥
सोळासहस्र गोपींसी । कृष्णनाथा भोगीशी, ।
ब्रम्हाचारी म्हणविशी । ळुळुळुळु रे ! ॥का०॥८॥
ऐसे तुझे पोवाडे । वर्णिताती वाडेकोडें, ।
विष्णुदास नामा म्हणे । हु हु हु हु रे ! ॥का०॥९॥
पद ५५ वें.
नर रामभजनबि न गत न तरनकी ।
कोटि उपाव कर रे ! ॥ध्रुवपद.॥
होम नेम बत तीरथ साध्यो । क्या हुआ बनखडबासा रे ! ।
चरनकमल उरमा उपजे । नहिं तों लग झूटी आस रे ! ॥नर०॥१॥
नरतनुपायो राम नहिं गायो । भूल्यो पशू गव्हारा रे ! ।
सिरपर काल खडा शर साधें । नामदेव कहे पुकारा रे ! ॥नर०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP