मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
कृष्णदासकृत पदें ३८ ते ३९

कृष्णदासकृत पदें ३८ ते ३९

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ३८ वें.

जसोमतसुत नंदलाला । बृजकी गैल डोले. ॥ध्रुवपद.॥
पीतांबर कछनि कास गव्वनके संग जात ।
फेट मुरलि मुगुट शीस बैस बैन बैन बोले. ॥जसो०॥१॥
ग्वालबाल स्म्ग लिये अंग अंग जोरे. ।
हात लकुटि दुधकी मटकी सखियनसो जोरे. ॥जसो०॥२॥
वृंदावन कुंज जात गावत हरि कृष्णदास ।
या छबी कुछा कहि न जात रसनामृत थोरे. ॥जसो०॥३॥

पद ३९ वें.

बाजिराव महाराज अजीं ऐकतो बायकांची ।
चल गडे ! जाऊं पुण्याशी, हौस मोठी माझ्या मनची ॥ध्रुवपद.॥
या चैत्रमासी आनंद करा हळदी कुंकुं गौरीचें, ।
नार गेली ग ! वाडयांत इनें भेट घेतली खाशाची ।

चाल ॥ या नारीनें जाऊन कसा लाविला लाग ? ।
पति आमुचे घरीं बसले कांहीं रोजगार सांग ।
हा सर्वस्वीं देह केला अर्पण करुनि आण तुमची. ॥बाजिराव०॥१॥
अर्जी करुनियां, पतिची चाकरी केली हुजुरीची ।
दिली एक अबदागीरी घोडी बसाया बरोबरीची ।
भरजरी दिला पोषाख दिली शालजोडी कलाबतुची.  ।

चाल ॥ कधिं नित्य जाई पालखींत वसून ।
कधिं नित्य येइ जरतार पितांबर नेसून ।
दिले हातीं हात सर दोन दोर गुलजार ।
कानिंचें कर्णफुल पाचूचे हिरवे चार
नाकियाची नथ जोडी उंच मोलाची ॥बाजिराव०॥२॥
श्रावणमासीं दाटि पुण्य़ामधें नागपंचमीची ।
शुक्रवारपेठेंत बसुनि हाजिरी घेतो बायकांची ।
चाल ॥ काळी सांबळी गोरीचा तोरा फार ।
उभे रस्त्याने चालले पहा जोडव्याचे ठणकार ।
जशी ज्याची योग्यता पाहुनि पैठवण करि तीची ॥वाजि०॥३॥
नारिच्या बलावर साधुनियां दरबार ।
कोठयानकोटी द्रव्य मिळविलें हें फार ।
कृष्णदास म्हणे ऐशा स्त्रिंया घरोघरीं असती ॥बाजिराव०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP