रमणतनयकृत पदें ५६ ते ५९
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ५६ वें.
यशोदासुत गाईं रे । यशोदासुत हरि गोविंद हरे आदिपुरुष
आनंदकंद अनुदिनि मुचकुंदवरद श्रीमुकुंद गाई रे ! ॥ध्रुवपद.॥
मधुमुरहर मदनजना विधिसुरनुत. स्तविति सनक, पालक त्रैलोक्य
व्यापक एक सर्वा ठाईं । येकि सकळ जग अनेक मृगजळमय भास फोक
हरुनि मोह शोक नाम घोकतचि तूं जाई. ॥यशोदा०॥१॥
इंदिरावरदगरुदगमन मंदरधर असुरसमन तो हरि वृजी नदतपें प्रगठुनि सुखदाई ।
शोभत कटि पीतवसन मोर मुगुट मंजुहसन, मुरलिधर गोपीजीवन क्रीडत कुंजशाई. ॥यशोदा०॥२॥
कमलनयन कलुषहरण विमलचरित भक्ततरण जननामरणभ्रमण हरूनि चरणीं शरण जाईं ।
वर्णिति ज्या श्रुतिपुराण वदत व्यास हें प्रमाण रमणतनय निश्वय जाण रत हरिगुरुपायीं. ॥यशोदा०॥३॥
पद ५७ वें.
तव गुणमहिमा । श्रीहरिरामा । वर्णिला न जाय. ॥ध्रुवपद.॥
न कळेचि पार निगमा, । शिणला चतुर्मुख ब्रम्हा ॥
तेथें आम्हां आतुडशी काय रे ! ॥तव गुण०॥१॥
शिणलीं सहस्त्र तोंडे । फणाशेषाऐशीं धेडें ॥
झाले वेडे न चले उपाय रे ! ॥तव गुण०॥२॥
तेथें माझी वाणी किती । रमणात्मज करी विनती ॥
द्यावी मुक्ति, दावी तव पाय रे ! ॥तव गुण०॥३॥
पद ५८ वें.
आणाना यदुराज । झडकरि आणाना युदराज. ॥ध्रुवपद.॥
माळ गळ्यांतिल व्याळसमचि, घननीळ नये सदनाला ।
वेळ नका बहु लावुं तयाविण राहिना जीव आज ॥झद०॥१॥
भोग सुखादिक रोग गमति वियोग न साहे सख्यांनो ! ।
वेगिं आणिं सये ! बाई ! तयाविण राहीना मम प्राण ॥झड०॥२॥
नंदतनय व्रजवृंदसहित कालिंदितटी करि लीला ।
मंदिरीं आणिं सखे, रमणात्मज वंदित पादसरोज ॥झड०॥३॥
पद ५९ वें.
येऊं दे करुणा भारमणा ! । दीनोद्धारणा ! रे ॥ध्रुवपद.॥
बुडलों रे ! भवसागरडोहीं । तारिं आम्हा शरणा ॥येऊं०॥१॥
हरिं अवव्या विषयादिक भ्रमणा । देउनि सत्क्रमणा ॥येऊं०॥२॥
विनवितो रमणात्मज जाणा । श्रीगुरु तव चरणा ॥येऊं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP