विठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ६६ वें.
राधिकेचा रंग पाहुनि कृष्ण दंग जहाला !॥ध्रुवपद.॥
वेणी फणी करुन भांग । काजल कुंकुं ल्यालि चांग ।
गोरे अंग चोळ तंग । दाखवी श्रीहरिला ॥रधि०॥१॥
राधिकेचा झकाझोंक । कृष्ण पाहुनि लावि नोक ।
जरीपातळाचा झोंक । पदर सांवरीला ॥रधि०॥२॥
कृष्ण पाहुनि झाली वेडी । हांसतांचि नेत्र मोडी ।
विठ्ठलनाथ भक्त गडी । चरणी रंगला ॥रधि०॥३॥
पद ६७ वें.
ढीग कासयासि करिसी जोग, लोक शीणवाया ॥ध्रुवपद.॥
देणें घेणें कारभार । लेवालेवी उदिम फार ।
कर्ज देउनि धरिसि द्वार । शेण कालवाया ॥ढीग०॥१॥
मंत्र, तंत्र, कळा जाण । आत्मरुपीं नाहीं ध्यान ।
विठ्ठलनाथ लावुनि वात । दीप मालवाया ॥ढीग०॥२॥
पद ६८ वें.
काय मना ! जना धना गुंतलासि लोभा ॥ध्रुवपद.॥
जन्ममरण नर्कद्वार । वासनेसि येरझार ।
विषय व्या संभ्रमांत फार । नाशिवंत शोभा ॥काय०॥१॥
विसरलासि शाश्वताचें ॥ नाम आत्मघाता ।
रतला कसा विठ्ठलनाथ । अंतकाळी तो बा ! ॥काय०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP