मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५

गोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ३२४ वें.

आलास पंढरीराया ! जग हें ताराया ! ॥ध्रुवपद॥
पतितपावन हे ब्रिद पायीं । शास्त्रें गर्जति साही ।
गणिका उद्धरली त्वां लवलाहीं । तूं दिनजनसुखदाई ।
दे क्षेम मला तूं सुख सदया ॥जग०॥१॥
मायासरितेच्या दीर्घ प्रवाहीं । बुडलों भवजलडोहीं ।
आशामगरीनें धरिलें पायीं । सोडीनाच उपायीं ।
त्राता न दिसे रे ! तुजविण सखया ॥जग०॥२॥
आतां ताराया मजला दीना । यावें रुक्मिणीरमणा ! ।
येथूनी काढावें रे अघशमना । स्वामी दीनोद्धरणा ! ।
गोविंदावरि करि छाया ॥जग०॥३॥

पद ३२५ वें.

किति अंत पाहसिल माझा रे ! गुणवंता ! ।
तुजविण पलयुग समजतों पंढरीनाथा ! ॥ध्रुवपद॥
पूर्वील पुन्य तव नाहीं माझे पदरीं ।
हा जन्म वृथा गोला देवा ! कंसारी ! ।
मन रयनदिवस इच्छित परधन परनारी ।
दु:खाचे डोंगा झाले या संसारीं ।
शुकव्यासमुखें कीर्ती ऐकिली भारी ।
नामें तरलें दोषाचे नामधारी ॥
चाल ॥ द्विज अजामीळ पुत्रमिषें दोषी तरला । अजि गुणवंता ! ।
शतकोटीं ब्रम्हाहत्या वाल्मिक उद्धरिला । अजि गुणवंता ! ॥
मारितां हाक नेलें वैकुंठा करिला । अजि गुणवंता ! ॥
नक्रें छळिताम कौटाळुनि हृद्रयीं धरिला । अजि गुणवंता ! ॥
उठाव ॥ असे अमित दोषी तारियले काय चिंता ।
मी कदा सोडिना तुम्हांसि अजि भगवंता ! ॥किती०॥१॥
मी लक्ष प्रकारें चुकलों कर्म ओढवलें ।
म्हणऊनि प्रभुपायाचें अतंर पडलें ।
दिधलें भाष्य परी मज कुणि कांहीं न घडलें ।
हे कामक्रोधमदममत्सर शरिरीं भिडले ।
अभिमानाहाती माझें मन सांपडलें ।
यास्तव नाना कर्मांचें अंतर पडलें ॥
चाल ॥ आतां अपराध क्षमा करीं विठ्ठलराया । अजि गुणवंता ! ।
ही मनोवृत्ती अर्पण केली पदिं जाया । अजि गुणवंता ! ॥
तूं तार इंवा ने निरया माझी काया । अजि गुणवंता ! ॥
मी बुड्तो तूं देहांत उभारुनि बाम्हा । अजि गुणवंता ! ॥
उठाव ॥ केधवां येसि मज न कळे अनाथनाथा ! ॥
तूं तातमात गणगोत दीनजनभ्राता ॥किति०॥२॥
अज्ञानपणीं बहु केले चाळे पाहीं ।
तूं क्षमा करीं गे ! माझे विठाबाई ! ।
परदेशीं कां मोकलिंलें मज लवलाहीं ।
तुजैण भासतसे वोस दिशा मज दाही ।
पाहतां शिणले हे नेत करूं गत कायी ? ।
विपरीत कल्पना बुडवीते भवडोहीं ॥
चाल ॥ तूं सकळ विश्वव्यापक नरहरी गुरुनाथा । अजि गुणवंता ! ।
गोविंद द्वैतमति कल्पित नुरेचि आतां । अजि गुणवंता ! ॥
मी दास तुझा तूं मुक्तपुरीचा दाता । अजि गुणवंता ! ॥
गुरु अभयवरद कर ठेवी माझे माथां । अजि गुणवंता ! ॥
उठाव ॥ आतां उचित जें येईल प्रभुच्या चित्ता ।
करिं क्लेशनिवारण स्वामी रुक्मिणीकांता !॥किति०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP