मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें ८० ते ८२

रामकविकृत पदें ८० ते ८२

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ८० वें.

कृष्णा ! स्मृति मनि धरिं धरिं प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
नरतनुमाजि सार्थक तूं करीं ॥कृष्णा०॥१॥
सर्व भूतीं देव हाचि भाव घरीं ।
येणें जन्ममरण निवारीं प्राण्या ! ॥कृष्णा०॥२॥
निरककृति सत्कर्म करूनियां ।
सतत कीर्तनी प्रेम धरीं प्राण्या ! ॥कृष्णा०॥३॥
राम म्हणे अरे ! हेंचि हें सार्थक ।
हरि निशिदिनीं घ्यान करी प्राण्या ! ॥कृष्णा०॥४॥

पद ८१ वें.

हरिचरणी प्रेम घरी प्राण्या रे ! ॥ध्रुवपद.॥
नवविध भक्ति करूनि सतत ।
अहंधर्म त्याग करी प्राण्या रे ! ॥हरि०॥१॥
एक आत्मा व्यापक द्वैत नाहीं ।
हेचि स्मृति निशिदिनीं घरीं प्राण्या रे ! ॥हरि०॥२॥
सर्व भूतीं देव भाव हाचि ठेवी ।
येणें अज्ञाननाश करी प्राण्या रे ! ॥हरि०॥३॥
राम म्हणे आतां सावध होईं ।
संतपायीं लक्ष लावी प्राण्या रे ! ॥हरि०॥४॥

पद ८२ वें.

निजरुपी प्रेम रे ! । निशिदिनीं आनंदेंकरूनि रे ! ॥ध्रुवपद.॥
मायानदींत भ्रमलों जन्म जाले बहु ।
विषयसुख घेता देवा ! आयुष्य गेलें रें ! ॥निज०॥१॥
काम क्रोध बैरी यांचें दु:ख थोर ।
येणं मन चंचळ आतां सोडवी श्रीहरि ! ॥निज०॥२॥
देवा ! पूर्ण कृपा करी । अंतरीं प्रगट होईं ।
भक्तिप्रेम देउनि जन्ममरण वारी ॥निज०॥३॥
राम अनन्यशरण प्रार्थना करितो ।
चरणिं ठाव देउन निजसुख देईं रे ! ॥निज०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP