मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
मायेहूनि माय मानी । करी ज...

संत जनाबाई - मायेहूनि माय मानी । करी ज...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मायेहूनि माय मानी । करी जिवाची ओंवाळणी ॥१॥

परलोकींचें तारूं । म्हणे माझा ज्ञानेश्वरु ॥२॥

वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ॥३॥

पतिव्रते जैसा पती । जनी म्हणे सांगों किती ॥४॥


References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP