मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो...

संत जनाबाई - शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥

ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥

स्वयें सुखें धाला आपणातें विसरला । तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥

नामयाची जनी सागरीं मिळाली । परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP